शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उपेक्षितांसाठीच्या योजनांना पुणे महापालिकेची कात्री; पैसे नसल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:39 IST

समाजातील निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पैसे नसल्याचे अनाकलनीय कारण यासाठी देण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमहापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापौर कार्यालयात झाली पक्षनेत्यांची बैठकसत्ताधाऱ्यांकडून उपेक्षित समाजघटकांवर होणारा अन्याय खेदजनक : चेतन तुपे

पुणे : समाजातील निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पैसे नसल्याचे अनाकलनीय कारण यासाठी देण्यात आले आहे. पक्षनेत्यांची बैठक महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापौर कार्यालयात झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, मनसेचे वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले आदी बैठकीला उपस्थित होते.महापालिकेच्या वतीने गेली अनेक वर्षे या योजना राबवल्या जात आहे. माता रमाई योजना. शरद स्वाभिमान योजना, बाबा आमटे योजना अशी त्यांची नावे आहेत. निराधार महिला, अपंग, गतीमंद अशांना त्यातून आर्थिक मदत देण्यात येत असते. अनेक गरजूंना या योजनेचा उपयोग झाला आहे. सुमारे १५ कोटी रुपये या योजनांसाठी लागतात. तशी तरतूदही अंदाजपत्रकात केली जाते. मागील वर्षी मात्र प्रशासनाने फक्त ५ कोटी रूपयांचीच तरतूद केली होती. आता आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना प्रशासनाने योजना बंद करण्याचा प्रस्ताव दिला व त्याला सत्ताधारी भाजपाने मान्यताही दिली. बैठकीत राष्ट्रवादी काँगेसने योजना बंद करण्याला विरोध केला. मात्र अन्य पक्षांच्या पाठिंब्याअभावी ते एकटे पडले. किमान जे अर्ज आले आहेत त्यांची छाननी करावी व त्यांना तरी मदत करावी अशी मागणी करण्यात आली. २७ हजार अर्ज आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मात्र ते अमान्य करण्यात आले. उलट या योजनांसाठी ठेवलेली ५ कोटी रुपयांची तरतूदही दुसऱ्या योजनेसाठी वर्ग करण्याला मान्यता देण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या जादा दराच्या निविदांना सहज मंजूरी देणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून उपेक्षित समाजघटकांवर होणारा हा अन्याय खेदजनक आहे, असे याविषयी बोलताना तुपे यांनी सांगितले. २७ हजार अर्जदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यानी केली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळकShrinath Bhimaleश्रीनाथ भिमालेChetan Tupeचेतन तुपे