शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मनपाचे नवीन अंदाजपत्रक सादर, मनपाच्या शाळांमधील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 12:26 IST

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी देखील वास्तवाचे भान ठेवत कोणत्याही नवीन योजनांचा भडीमार न करता व मागील वर्षापेक्षा ४२ कोटींने कमी ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक मंगळवारी रोजी मुख्य सभेला सादर केले.

पुणे -  महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी देखील वास्तवाचे भान ठेवत कोणत्याही नवीन योजनांचा भडीमार न करता व मागील वर्षापेक्षा ४२ कोटींने कमी ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक मंगळवारी ( 27 फेब्रुवारी ) रोजी मुख्य सभेला सादर केले. प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते.शहराच्या विस्तारीकरणाच्या वेगासोबत पायाभूत सुविधांची उपलब्धता त्याच गतीने वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मेट्रो, पीएमपीएमलचे सक्षमीकरण, सायकल योजना, इंटरनेटला गती देण्यासाठी केबल डक्टचे जाळे, 24 तास पाणी पुरवठा आणि नदी सुधार योजना मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यासोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्याने उड्डाणपूल, बोगदा आणि महत्त्वाकांक्षी एचसीएमटीआर मार्गाचे काम सुरू करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. जुन्या योजना कायम ठेवताना  लोकानुनाय करणार्‍या योजना  यंदा जाणीवपूर्वक टाळण्यात आल्या आहेत, असा दावा मोहोळ यांनी यावेळी केला.याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, रिपाइंच्या गटनेत्या वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले याप्रसंगी सभागृहात उपस्थित होत्या. 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, की मेट्रोचे काम सुरु झाले आहे. त्याला गती देण्यासाठी राज्य शासन तसेच पालिका स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बस खरेदी, बस डेपोसाठी जागा आणि त्यांचा विकास करण्याचा निर्णय या अगोदरच झाला आहे. यासोबतच सायकल योजनेला मंजुरी देण्यात आली असून लवकरच सायकल ट्रॅकची कामे सुरू होतील. महापालिकेचा बहुचर्चित एचसीएमटीआर मार्गाचे काम सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केल्याने या मार्गाचे काम सुरु करण्यात येईल. प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरातुन शहराला जोडणारा एकच मार्ग असल्याने सततची वाहतूक कोंडी ही ता भागातील मोठी समस्या आहे. या करिता सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल तसेच तळजाई ते सिंहगड रस्ता जोडण्यासाठी बोगद्याचे काम यावर्षी सुरु करण्याचे नियोजन आहे. तसेच सिंहगड रस्ता आणि कर्वे नगर ला जोडण्यासाठी नदीवरील उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात येणार आहे.