शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची ५० लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबरपासून 'अभय' योजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 20:52 IST

मिळकत कराच्या रक्कमेवर दरमहा व्याज म्हणून लावलेल्या शास्ती कराच्या रक्कमेत ८० टक्के सवलत मिळणार

ठळक मुद्दे२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळकतकर अभय योजना

पुणे : मिळकत कराची ५० लाखापर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर ,२०२० पर्यंत पुणे महापालिकेने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ या योजनेच्या कालावधीत थकबाकीदारांनी मिळकतकर भरल्यास, त्यांना मूळ मिळकत कराच्या रक्कमेवर दरमहा व्याज म्हणून लावलेल्या शास्ती कराच्या रक्कमेत ८० टक्के सवलत मिळणार आहे.    मिळकतीवर आकारण्यात येणाऱ्या तीन पट शास्ती व दंडामुळे मोठ्या प्रमाणात मिळकतकराची रक्कम गेली काही वर्षे थकली आहे़ यामुळे महापालिकेच्या उत्त्पन्नावरही परिणाम झाला आहे़ त्यातच मागीलवर्षी पावसामुळे झालेले नुकसान व यावर्षी  कोरोना आपत्तीमुळे, मिळकत धारकांकडून थकबाकी वसुल करताना दरमहा आकारण्यात आलेला २ टक्के दंडाच्या रक्कमेत ८० टक्के सूट देण्यात यावी व यासाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळकतकर अभय योजना राबवावी, असा प्रस्ताव सदस्यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यानुसार स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये तो गुरूवारी मान्य करण्यात आला.     मात्र ही मान्यता देताना सरसकट सर्व थकबाकीदारांसाठी अभय योजना न राबविता, ज्यांची थकबाकी ५० लाखापर्यंत आहे अशांनाच या योजनेचा लाभ द्यावा़ अशी उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेल्या सत्ताधारी भाजपला दोन पावले मागे घेत ही उपसूचना स्विकारून, ५० लाखापर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर ,२०२० पर्यंत अभय योजना राबविण्याचा निर्णय एकमताने घ्यावा लागला.  तसेच ३० सप्टेंबर २०२० पर्यंत नियमित मिळकत कर भरणाऱ्या थकबाकीदारांना सर्वसाधारण करामध्ये १५ टक्के सवलत देण्याची उपसूचना सर्व पक्षीय सदस्यांनी दिली व ही उपसूचनाही मान्य करण्यात आली़ यामुळे मोबाईल टॉवर्सची थकबाकी वगळता ५० लाखांपर्यंतची थकबाकी असणाºयांसाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात ही योजना राबविली जाणार आहे.--------------------------     

    कोरोना आपत्तीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेचे उत्पन्न घटले असून, आपत्ती निवारणासाठी पालिकेचे आत्तापर्यंत साधारणत: साडेतीनशे कोटी रूपये खर्च झाले आहेत. यापुढील काळातही आरोग्य सेवेकरिता पालिकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. अशावेळी महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मिळकत कर जमा करण्याबरोबरच, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ५० लाखापर्यंत मिळकतकर थकबाकी असलेल्यांकरिता ही अभय योजना राबविण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. तर ५० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर