शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिका घरोघरी सर्वेक्षणाकरिता करणार २०० डिजिटल थर्मामीटरची खरेदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 21:23 IST

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता आरोग्य विभाग, स्थानिक क्षेत्रीय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके निर्माण

ठळक मुद्देताप, सर्दी, खोकला अथवा कोरोना सदृश लक्षणे आहेत का याची माहिती घेण्यास सुरुवात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुणे महानगरपालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता नेमलेल्या पथकांना आवश्यक असलेल्या डिजीटल इन्फ्रारेड थर्मामिटरची खरेदी केली जाणार असून याद्वारे नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर पालिकेने नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आरोग्य विभाग, स्थानिक क्षेत्रीय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके निर्माण करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय् स्तरावर ही पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांना नागरिकांच्या घरी जाऊन कोणाला ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोना सदृश लक्षणे आहेत का याची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली. आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य या पथकांना पुरविण्यात आले.पालिकेकडे उपलब्ध असलेले थर्मामीटरही या पथकांना देण्यात आले. या थर्मामिटरद्वारे नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. पालिकेच्या दवाखान्यांमधील डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांनी पालिकेकडेही डिजीटल थर्मामीटर असावेत अशी मागणी केली आहे. त्यानुसार, पालिकेचा आरोग्य विभाग आता तब्बल २०० डिजीटल थर्मामिटर खरेदी करणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मागणी आणि तपशीलवार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या आहेत.=====डिजिटल थर्मामीटरचा काय होणार फायदाडिजिटल थर्मामीटरमुळे नागरिक तपासणी करणारे कर्मचारी यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहणार आहे. लांबूनच इन्फ्रारेड किरणांच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंगात किती ताप आहे , शरीराचे तापमान नेमके किती आहे हे समजू शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केल्या जाणाऱ्या या थर्मामीटरचा उपयोग नंतरही दवाखान्यांमध्ये केला जाऊ शकतो. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस