शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका जुन्या सोनोग्राफी मशीन नष्ट करणार : आरोग्य विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 20:35 IST

या मशीन नष्ट करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेची मदत घेतली जाणार

ठळक मुद्देशहरात अशा ६० मशीन असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी सात मशीन नष्ट केल्या जाणार

पुणे : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये वापरल्या गेलेल्या जुन्या बंद असलेल्या सोनोग्राफी मशीन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नष्ट केल्या जाणार आहेत. या मशीन नष्ट करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. या कारवाईसाठी मशीन मालक असलेल्या लॅब आणि हॉस्पिटलकडून शुल्क भरून घेण्यात आले आहे. एकूण ६० मशीन नष्ट केल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी सात मशीन नष्ट केल्या जाणार आहेत. 

राज्य सरकारने जुन्या आणि अव्यवसायिक सोनोग्राफी मशीनची वैज्ञानिक विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली आहेत. जुन्या सोनोग्राफी मशिनचा गैरवापर लिंगनिदान आणि स्त्री भ्रूणहत्येसाठी होण्याची शक्यता आहे. डायग्नोस्टिक तंत्र (नियमन आणि गैरवापर प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) च्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी राज्य पर्यवेक्षक मंडळाचे गठनही यापूर्वी करण्यात आलेले आहे. या मशीन नष्ट करण्यासाठी (स्क्रॅपिंग) मानक कार्यप्रणाली (एसओपी) सोनोग्राफी मशीन्स समितीने तयार केलेल्या आहेत. या अल्ट्रासाऊंड मशीनची वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने धोरण तयार केलेले असून शासनाने यासंदर्भात आदेशही काढलेले आहेत. ज्या मशीन टाकून देण्यात आल्या किंवा वापरात नाहीत अशा मशीनचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. 

या मशीनची ई-कचरा म्हणून कशी विल्हेवाट लावायची अथवा विक्री करायची याबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या मशीनच्या वेगवेगळ्या भागांना वेगळे करून त्याचाही दुरुपयोगासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आदींची देखरेख समितीही तयार केलेली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहराच्या विविध रुग्णालयातील बंद असलेल्या किंवा वापरात नसलेल्या ६० सोनोग्राफी मशीनच्या विल्हेवाटीचा निर्णय घेतल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले. --------- राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शहरातील बंद असलेल्या किंवा वापरात नसलेल्या जुन्या सोनोग्राफी मशीनची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. शहरात अशा ६० मशीन असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी सात मशीन नष्ट केल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वच्छ संस्थेची मदत घेतली जाणार असून संस्थेचा ई-वेस्ट विभाग या मशीन नष्ट करणार आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे. - डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी   

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका