शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पुणे महापालिका : टीडीआरचे २० वर्षांपासून आॅडिटच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:07 IST

महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) विकसकांना दिले जाते. परंतु गेल्या वीस वर्षांत या टीडीआरचे लेखापरीक्षणच (आॅडिट) झाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

पुणे : महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) विकसकांना दिले जाते. परंतु गेल्या वीस वर्षांत या टीडीआरचे लेखापरीक्षणच (आॅडिट) झाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कोथरूडसारखे टीडीआर घोटाळे होऊ शकतात, अशी भीती नगरसेवकांनी मुख्य सभेत व्यक्त केली. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी यासंबंधीचा अहवाल पुढील मुख्य सभेला सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून टीडीआर दिला जातो. त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतही एसआरए प्राधिकरणामार्फत टीडीआर दिला जातो. १९९७ पासून महापालिकेकडून हा टीडीआर दिला जातो. मात्र, महापालिकेने वीस वर्षांत जो टीडीआर दिला आहे, त्याचे लेखापरीक्षणच केले गेले नसल्याचे सोमवारी सभागृहात समोर आले. सुभाष जगताप यांनी एसआरएच्या माध्यमातून किती टीडीआर दिला गेला आणि त्याबदल्यात किती सदनिका पालिकेच्या ताब्यात आल्या, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाकडे ही माहिती नव्हती. त्यावर बागुल यांनी दर सहा महिन्याला टीडीआरच्या लेखापरीक्षणाचा अहवाल मुख्य सभेला सादर करावा, अशी उपसूचना दिली. मात्र, सत्ताधारी पक्षाने त्यावर आक्षेप घेतला. अखेर लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यावर हरकत काय, असा मुद्दा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर महापौरांनी हा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.लेखापरीक्षणही टाळले , घोटाळे होण्याची भीतीकायद्यानुसार लेखापरीक्षण करणे बंधनकारक असतानाही प्रशासनाने त्यावर कार्यवाही केलेली नाही. नगरसेवक आबा बागुल यांनी त्यावर प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, महापालिकेने टीडीआरच्या माध्यमातून घेतलेल्या जागा आणि दिलेला टीडीआर याचा ताळमेळ नाही.विकसकाला जे हस्तांतर शुल्कपत्र दिले जाते, त्याची नक्की किती पुस्तके छापली गेलीत, ती कोण छापतोयाची माहिती सभागृहाला पाहिजे; अन्यथा टीडीआर घोटाळे होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका