शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"पुणे महापालिकेने 'क्वारंटाईन'घरातील कचरा वेगळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 15:15 IST

गेल्यावर्षी पुण्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असताना पुणे महानगरपालिकेने गृह विलगीकरण बाधितांचा कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा केली होती.

पुणे : पुणे शहरात मागील काही महिन्यात आटोक्यात आलेली कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. पुन्हा एकदा शहरात कोरोनाचा विस्फोट होऊ नये या पार्श्वभूमीवर पुणेकरांवर महापालिकेने काही निर्बंध देखील लादण्यात आले आहे. याचवेळी बहुसंख्य कोरोनाबाधित रुग्ण  'होम क्वारंटाइन'चा पर्याय स्वीकारत आहे. अशावेळी पुणे महानगरपालिकेने 'गृहविलगीकरण'घरांतील कचरा वेगळा गोळा करून तो जाळून टाकत त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची व्यवस्था तातडीने करण्याची गरज आहे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

वेलणकर म्हणाले, गेल्यावर्षी पुण्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असताना पुणे महानगरपालिकेने गृह विलगीकरण बाधितांचा कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा केली होती. यात पुण्याच्या प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र गाडी व त्यावर स्वच्छता सेवकांचा एक संघ कार्यरत होता. गृह विलगीकरण घरामधील लोकांकडून  ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवला जात होता. योजनेतील कचरा सेवक दोन दिवसांतून एकदा येऊन दाराबाहेरील कचरा घेऊन जात होते. कचरा पिशव्यांमध्ये पॅक करून त्यावर सॅनिटायझर मारून दाराबाहेर ठेवावा हे नागरिकांचे काम होते. ही सेवा पूर्णपणे मोफत होती.

महापालिकेची ही योजना सध्या बंद असल्याने अनेक ठिकाणी विलगीकरण केलेल्या घरांमधील कचराही सोसायटीच्या इतर कचऱ्यात एकत्रितपणे टाकला जात आहे. ही बाब अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक आहे.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. .... पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तातडीने पुण्यातील क्वारंटाईन घरांमधील कचरा स्वतंत्रपणे उचलण्याची सोय महापालिकेने परत सुरू करणे अतिशय गरजेचे आहे. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याVivek Velankarविवेक वेलणकरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न