शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'आरपीआय'चा 'भाजप'वर भरोसा नाय काय ;  पुणे  महापालिकेत रंगले सत्तानाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 17:33 IST

एकीकडे राज्यात भाजप शिवसेना युती तुटलेली असताना पुणे महापालिकेतही भाजप आणि आरपीआय यांच्यात नाराजीनाट्य बघायला मिळाले.

पुणे : एकीकडे राज्यात भाजप शिवसेना युती तुटलेली असताना पुणे महापालिकेतही भाजप आणि आरपीआय यांच्यात नाराजीनाट्य बघायला मिळाले. गेल्या अडीच वर्षांपासून आरपीआयकडे असलेले उपमहापौर पद काढून घेतल्याने आरपीआय नगरसेवकांनी थेट भाजपच्या दालनातून काढता पाय घेतला.त्यांना समजवण्यासाठी भाजप शहाराध्यक्षा माधुरी मिसाळ आणि खासदार संजय काकडे यांनीही प्रयत्न केले. अखेर नाईलाज झाल्यावर त्यांनी भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रामदास आठवले यांना फोन केला आणि हा तिढा सुटला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महापालिकेत महापौरपदासाठी आज भाजप आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी भाजपतर्फे महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला. परंतू याआधी आरपीआयकडे असलेले उपमहापौरपद भाजपने ताब्यात घेतल्याने आरपीआय नगरसेवक नाराज झाले. इतकेच नाही तर त्यांनी भाजपच्या दालनातून बाहेर पडून विरोध व्यक्त केला. त्यात डॉ सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर आदींचा समावेश होता . त्यांची भाजप पदाधिकारी समजूत काढत होते मात्र विषय वाढण्यास सुरुवात झाली. अखेर भाजपने कोणताही धोका न पत्करता थेट प्रदेशाध्यक्ष पाटील यांना फोन केला. त्यांनी आठवले यांच्याशीच बातचीत केली आणि विषयावर पडदा टाकला. 

 २०१७ साली झालेल्या निवडणुकीनंतर भाजप -आरपीआय युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यावेळी आरपीआयच्या नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद देण्यात आले. त्यांच्या निधनानंतर डॉ सिद्धार्थ धेंडे यांना उपमहापौरपदी काम करण्याची संधी मिळाली. आता महापौर आणि उपमहापौरपदांचे अर्ज दाखल करताना आरपीआयला त्यांचे पद कायम राहण्याची आशा होती. मात्र तसे झाले नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मानसी देशपांडे यांचे नाव उपमहापौरपदाकरिता निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी आरपीआयची भूमिका बदलल्याने त्यांच्या जागी शेंडगे यांना संधी देण्यात आली. 

टॅग्स :BJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवलेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका