शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचा अजब कारभार : मृत कर्मचाऱ्याला लावली इलेक्शन डयुटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:22 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांची नियुक्ती केली असून, यामध्ये पाच महिन्यांपूर्वी मृत्यु पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई चंद्रकांत रामचंद्र रसाळ कर्मचा-याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांची नियुक्ती केली असून, यामध्ये पाच महिन्यांपूर्वी मृत्यु पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई चंद्रकांत रामचंद्र रसाळ कर्मचा-याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. याबाबत तातडीने निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देखील विभागाने दिले. परंतु नियुक्ती दिलेली व्यक्तीच हयात नसल्याचे नगर सचिव विभागाने महापालिकेच्या सामान्यप्रशासन विभागाला काळविले आहे.महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. येत्या २३ जून रोजी या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कामांसाठी महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एकट्या नगरसचिव विभागातील २५ कर्मचा-यांना निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्येच या मृत कर्मचा-याचा समावेश आहे. नगरसचिव विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती कुणाच्या पथ्यावरनगरसचिव विभागातील कर्मचा-यांचा शहरातील सर्व नगरसेवकांसोबत विविध कामा निमित्त थेट संबंध येतो. परंतु याच विभागातील सर्वांधिक सुमारे २५ कर्मचा-यांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीची कामे  देण्यात आली आहेत. त्यामुळे नगरसचिव विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती या निवडणुकीत नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार हे लवकर स्पष्ट हाईल.सामान्य प्रशासन विभागाच्या सूचीनुसार कर्मचा-यांना नियुक्तीनिवडणुकीच्या कामांसाठी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून यादी मागविण्यात येते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या यादीच्या आधारे निवडणुकीच्या कामांसाठी कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये आमच्या विभागाचा काही दोष नाही.-विजय दहिभाते, उपआयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक