शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या चुकीमुळे पुणे महापालिकेला ५०० कोटींचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 10:46 IST

महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगाराचे ठेकेदारांची बिले व अन्य खर्च असा एकूण सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत महापालिका प्रशासन चालू बँक खात्यात ठेवत होते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे पगार व अन्य खर्चांची रक्कम बचत खात्याऐवजी ठेवली चालू खात्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याची मागणी

पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी व अन्य विविध खर्चांची कोट्यवधी रुपयांची रक्कम आतापर्यंत बचत खात्याऐवजी चालू खात्यात ठेवण्यात येत होती. यामुळे गेल्या दहा वर्षांत महापालिकेला तब्बल ५०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप सदस्यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. याबाबत चौकशी करुन अहवाल सादर करण्याची मागणी देखील यावेळी सदस्यांनी केली.     महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगाराचे दर महिन्याचे सुमारे ७० ते ८० कोटी रुपये,  ठेकेदारांची बीले  व अन्य खर्चाचे तब्बल ५० ते ६० कोटी असे एकूण सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी आता पर्यंत महापालिका प्रशासन चालू बँक खात्यात ठेवत होते. परंतु हाच निधी बचत खात्यामध्ये ठेवला असता तर महापालिकेला वर्षांला तब्बल ५० कोटी रुपयांचे व्याज मिळाले असते. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे गेल्या दहा वर्षांत महापालिकेला तब्बल ५०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला.     गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या एकूण उत्पन्नामध्ये घट होत असून, निधी अभावी सदस्य, अधिकारी ओरडत आहेत. राज्य शासनाने जकात बंद केल्यानंतर यामध्ये अधिकच घट झाली असून, एकूण उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला आहे. यामुळे प्रशासनाकडून निधी खर्चांवर वेगवेगळ्या पध्दतीने निर्बंध आणत आहे. परंतु महापालिकेचे उत्पन्न वाढावे, यासाठी नवीन पर्याय शोधण्यामध्ये प्रशासन कमी पडत असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. -------------------महापालिकेचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करामहापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या पगारासाठीच वर्षाला तब्बल एक ते दीड हजार कोटी रुपयांचा खर्च येतो. यामुळे ही कोट्यवधी रुपयांची रक्कम दर महिन्यांला लागेल तशी खर्च केली जाते. केवळ वेतनासाठी लागणार निधीचा एफडी केला अथवा बचत खात्यात ठेवला तरी महापालिकेला वर्षाला ३० ते ४० कोटी रुपयांचे व्याज मिळेल. परंतु महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा मोठा फटका महापालिकेला बसला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिका-यांवर कारवाई करा.-राजेंद्र शिळीमकर, स्थायी समिती सदस्य--------------------------------आरबीआयच्या नियमानुसारच निधी चालू खात्यात ठेवलाप्रत्येक शासकीय संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणता निधी कोणत्या खात्यांमध्ये ठेवायचा यासाठीचे नियम ठरले आहेत. त्यातही महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतन व पेन्शनसाठीचा निधी आरबीआयच्या नियमानुसारच चालू बँक खात्यात ठेवण्यात आला आहे. यामुळे यामध्ये कोणत्याही स्वरुपाची अनियमिता झालेली नाही.- उल्का कळसकर, मुख्य लेखापरीक्षक महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका