शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेेने रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने केली जप्त; लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात

By राजू हिंगे | Updated: January 3, 2024 14:53 IST

महापालिकेकडून यापुर्वी जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रीया दोन वेळा राबविली आहे

पुणे :  शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात.  त्याने वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. त्यासाठी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वर्षभरात रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने जप्त केली आहे. त्यापैकी ५०६ वाहनांचा लिलाव केला जाणार असुन त्या  प्रक्रियेला सुरवात झाली आहे.      शहरातील बेवारस वाहनाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हालवण्यासाठी आरटीओच्या मदतीने वहान मालकांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजावल्यानंतरही वाहने न हालवल्यास वाहतुक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात अतिक्रमण विभागाने विविध प्रकारची ५३५ वाहने जप्त केली आहे. यामध्ये ३४५ दुचाकी,९२तीन चाकी, ९१चार चाकी आणि ६ चाकी वाहने जप्त केली आहे. यापैकी ५ दुचाकी, ७ तीन चाकी, १६ चार चाकी आणि १ सहा चाकी वाहन मुळ मालकांनी परत नेली आहेत. सध्या महापालिकेकडे ५०६ वाहने  शिल्लक असुन, त्या वाहनांचा लिलाव लवकरच केला जाणार आहे. महापालिकेकडून यापुर्वी जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रीया दोन वेळा राबविली आहे. २०१८ मध्ये १६ लाख रुपये लिलावातून मिळाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये १ हजार १४६ लिलाव केला गेला आहे. त्यातुन पालिकेला १ कोटी २३ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

टॅग्स :Puneपुणेbikeबाईकcarकारauto rickshawऑटो रिक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका