शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवा वगळता रस्ते खोदाई पुणे महापालिकेने थांबवली

By निलेश राऊत | Updated: May 5, 2023 17:48 IST

अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण व समान पाणी पुरवठ्याची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण व समान पाणी पुरवठ्याची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पावसाळी गटारे व नाले सफाईची कामे १० जूनपर्यंत पुर्ण करावेत अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पावसाळी कामांचा महापालिका आयुक्तांनी नुकताच आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शहरात आत्तापर्यंत पावसाळी गटारे व नाले सफाईची २६ टक्के कामे पूर्ण झाली असून हे काम येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गत पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना आलेल्या ओढ्याचे स्वरूपामुळे महापालिका प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची तयार महापालिकेने केली आहे.

आजमितीला शहरातील रस्ते दुरूस्तीची ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तसेच केबल व अन्य सेवा वाहीन्यांसाठी खोदाईची परवानगी देताना ३१ मे पुर्वी खोदाई केलेल्या रस्त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने दुरूस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही अधिकार्यांना दिले आहेत.

ड्रेनेजलाईनसाठी विशेष अधिकार वापरून जागा घेणार

समाविष्ट गावांमध्ये ३८५ कोटी रुपयांची ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून ही कामे सुरू असून पुढील अडीच वर्षात कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार ड्रेनेज लाईनची कामे करताना काही ठीकाणी खाजगी जागेतून पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत. याला जागा मालकांचा विरोध होत आहे. अशा ठिकाणी कायद्याचा वापर करून ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तroad safetyरस्ते सुरक्षा