शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

काेराेनाकाळातही पुणे- मुंबईमध्ये सर्वाधिक घरखरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST

पुणे : सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत, वर्क फ्राॅम हाेमचे वाढते प्रमाण त्याचबराेबर बांधकाम व्यावसायिकांनी राबविलेल्या विविध याेजना यामुळे ...

पुणे : सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत, वर्क फ्राॅम हाेमचे वाढते प्रमाण त्याचबराेबर बांधकाम व्यावसायिकांनी राबविलेल्या विविध याेजना यामुळे काेराेनाच्या काळातही घरखरेदीचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीतच देशात ५८,३०० घरांची विक्री झाली आहे. यामधील ५३ टक्के खरेदी ही केवळ पुणे, मुंबई आणि उपनगरांत झाली आहे.

कोरोनाच्या काळातही बांधकाम क्षेत्राने सकारात्मकतेकडे सीमोल्लंघन केले आहे. घर खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने हे चित्र समोर आले आहे. देशातील बड्या सात शहरांचा विचार केला देशातील ५८,३०० घरांची या काळात विक्री झाली. मात्र यातील ५३ % वाट मुंबई व उपनगरे आणि पुणे यांचा आहे.

ॲॅनारॉक संस्थेने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. २०१९ मध्ये भारतातील ७ प्रमुख शहरात २,६१,००० घरांची विक्री झाली त्यात मुंबई व उपनगरे आणि पुण्याचा वाटा ४७ % होता. २०२० मध्ये तो १ ,३८,००० इतका असताना त्यात मुंबई व उपनगरे आणि पुणे यांचा वाटा ४९ टक्के झाला. मात्र २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ५८,३०० घरांची या काळात विक्री झाली मात्र यातील ५३ टक्के वाटा मुंबई व उपनगरे आणि पुणे यांचा आहे. पुण्यातील समतोल वातावरण, वाढते माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षणाच्या अगणित आणि दर्जेदार संधी, सामन्यांच्या आजही आवाक्यात असलेले दर कोल्हापूर,सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक अशा शहरातून स्थलांतरित होताना ग्राहक पुण्याला झुकते माप आवर्जून देतात.

शासनाने घर खरेदीसाठी दिलेल्या कर सवलतीचा मोठा वाटा यामध्ये आहे. लॉकडाउनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यांना घरामध्ये अतिरिक्त खोली असणे आवश्यक वाटत असल्याने अनेक गरजू ग्राहकांनी घरखरेदीची स्वप्नपूर्ती केली आहे.

-विनीत गोयल

सह - व्यवस्थापकीय संचालक, कोहिनुर ग्रुप

गृहकर्ज दर हे आजवरच्या तुलनेत नीचांकी आहेत. त्यामुळे वैयक्तिक ग्राहकाची गृहकर्ज घेण्याची मर्यादा वाढल्याने मोठ्या घरांच्या खरेदीकडे कल वाढला आहे. मागील वर्षीपेक्षा सुद्धा जास्त गृहखरेदीची टक्केवारी वाढली आहे याशिवाय सरकारी कर सवलत हा गृह विक्री वाढण्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. शासनाला अशी विनंती आहे की यापुढेसुद्धा ही सवलत किमान ३ महिने मिळावी जेणे करून ग्राहक अधिकाधिक घर खरेदीकडे आकर्षित होईल.

- अमित परांजपे, हेड बिझनेस डेव्हलपमेंट

परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन