शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: सायकल घेऊनही करू शकता मेट्रोने प्रवास; महामेट्रोची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:26 IST

महामेट्रोने सुरूवातीपासूनच स्वत:ची सायकल घेऊन मेट्रोने प्रवास करण्यास परवानगी दिली

पुणे : मेट्रोचेप्रवासी आता स्वत:ची सायकल घेऊनही मेट्रोने प्रवास करू शकता. शशांक वाघ असे सायकल घेऊन प्रवास करणारे सोमवारी पहिलेच प्रवासी ठरले. गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा प्रवास त्यांनी केला.

सोमवारी सकाळीच वाघ आपली सायकल घेऊन गरवारे स्थानकात आले. बरोबर ८ वाजता मेट्रो सुरू झाली. सायकल घेऊन स्थानकात चाललेल्या वाघ यांना सुरक्षा रक्षकाने मनाई केली, मात्र वाघ यांनी त्याला वरिष्ठांबरोबर बोलण्यास सांगितले. महामेट्रोने सुरूवातीपासूनच आपली स्वत:ची सायकल घेऊन मेट्रोने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. सुरक्षा रक्षकाला तसे सांगितल्यानंतर वाघ यांना स्थानकात प्रवेश मिळाला. त्यांनी तिकीट काढले. सायकल घेऊन स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर आले व गाडीत सायकलसह प्रवेश केला. आनंदनगरला गाडीतून खाली उतरले व सायकल घेऊन स्थानकाबाहेर आले.

वाघ यांनी सांगितले की, रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी सायकल व मेट्रो हा उत्तम सहयोग आहे. परदेशांमध्ये सायकलींसाठी स्वतंत्र बोगी असते. आपल्याकडे अशी स्वतंत्र बोगी करणे शक्य नाही, तरीही महामेट्रोने परवानगी दिली आहे ही चांगली गोष्ट आहे.

प्रवाशांनी विशेषत: महाविद्यालयीन युवकांनी याचा वापर करावा...  ''सायकलसह प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे, मात्र अन्य प्रवाशांना सायकलचा त्रास होणार नाही याची सायकलधारी प्रवाशांनी काळजी घ्यावी. सध्या तरी सायकलसाठी स्वतंत्र जागा नाही, मात्र डब्याच्या मागे वगैरे सायकल लावता येणे शक्य आहे असे हेमंत सोनवणे (संचालक, जनसपंर्क, महामेट्रो) यांनी सांगितले आहे.'' 

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासीticketतिकिटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका