शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाने नाभिक असलेला डेबेबे ठरला पुणे मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 02:28 IST

इथिओपियाच्या अ‍ॅटलॉ डेबेबे याने रविवारी पुणे मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या मुख्य शर्यतीत विजेतेपद पटकावले.

पुणे : इथिओपियाच्या अ‍ॅटलॉ डेबेबे याने रविवारी पुणे मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या मुख्य शर्यतीत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, व्यवसायाने नाभिक असलेल्या ३३ वर्षीय डेबेबे याने आपल्या देशाबाहेर जिंकलेली ही पहिलीच स्पर्धा ठरली. हा पराक्रम त्याने देशाबाहेर सहभागी झालेल्या पहिल्याच स्पर्धेत केला. महिलांच्या मुख्य शर्यतीतील विजेती केनियाची पास्कालिया चेपकोगेई हिचा अपवाद वगळता विदेशी गटातील सर्व शर्यतींत पहिले तिन्ही क्रमांक इथिओपियाच्याच खेळाडूंनी पटकाविले.सणस मैदानापासून सुरू झालेली ४२.१९५ किलोमीटर अंतराची मुख्य शर्यत डेबेबे याने २ तास १७ मिनिटे १७ सेकंद अशी वेळ देत जिंकली. गतविजेता इथिओपियाच्याच गुजशू बेशा याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने २ तास १८ मिनिटे ७ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. इथिओपियाचा असेफा बेकेले अबेले (२ तास १८ मिनिटे ३८ सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.८ वर्षांच्या कालखंडानंतर यंदा झालेल्या महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी मारणाºया चेपकोगेई हिने २ तास ५० मिनिटे २७ सेकंदांची वेळ दिली. ४ वर्षीय मुलांची आई असलेल्या चेपकोगेई हिचा पतीदेखील धावपटू आहे. त्याने यंदा फेब्रुवारीत हैदराबादमध्ये झालेली मॅरेथॉन जिंकली होती. भारतात आतापर्यंत अनेक शर्यतींत सहभागी झालेली चेपकोगेई मागील वर्षी या स्पर्धेत तिसरी आली होती. बेलेव एसार मेकॉनेन आणि फेकेडे सिमेन तिलाहून या इथिओपियाच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.२१.०९८ किलोमीटर अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत पुरुषांच्या गटामध्ये इथिओपियाच्या डेकेबे मिटकू तफा याने १ तास ३ मिनिटे५६ सेकंद वेळ देत बाजी मारली. ही शर्यत १ तास १९ मिनिटे ०९ सेकंद वेळेत पूर्ण करणारी इथिओपियाचीच डेगेफा डिबिबे गेझमू महिला गटामध्ये अव्वल ठरली.पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे चेअरमन, माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता मुख्य शर्यत सुरू करण्यात आली. पॅरालिम्पिकपटू मुरलीकांत पेटकर, खासदार वंदना चव्हाण, मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अ‍ॅण्ड डेपोचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सल, आयजीपी कृष्णप्रकाश, पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय दामले, कुलदीप सोनी, कविता नंदी या वेळीउपस्थित होते.कलमाडी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या वेळी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. अभय छाजेड, मुरलीकांत पेटकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, धनंजय दामले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.