शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lockdown : अधिकृत घोषणा.... पुण्यात १३ ते २३ जुलै कडक लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरू, काय बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 17:14 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा..

ठळक मुद्देउद्या जाहीर होणार लॉकडाऊनची नवीन नियमावली

पुणे : पुणे शहर,पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंतच्या एकूण 10 दिवसांच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी ( दि.१०) केली आहे. त्यात पहिले पाच दिवस अत्यंत कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असेल. त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. नवीन लॉकडाऊनची नियमावली उद्या सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. 

विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोनाची संख्या खूप झपाटयाने वाढते आहे. त्यामुळे कोरोना साखळीला ब्रेक लावण्यासाठी हा लॉकडाऊन असेल तसेच या कालावधीत आरोग्य विभागाला कोरोनाविरुद्ध सक्षम वैद्यकीय यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेळ मिळणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांना ऑनलाईन पासेस पोलिस आयुक्त उपलब्ध करून देणार आहे. दुध ,औषधांची दुकाने सुरू राहनअशास्कीय कार्यालय, सविस्तर आदेश निर्गमित होतील. नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्हा लॉकडाऊन जाहीरच आहे. परंतु, आपण काही सवलती दिल्या होत्या. मात्र नागरिकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले.  म्हणून सर्वानुमते लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात पूर्वीसारखेच बंधने असणार आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन योग्य ठरेल. मात्र लगेच रुग्णवाढ रोखली जाणार नाही. लॉकडाऊनचा परिणाम दिसण्यासाठी काही दिवस लागणार आहे..

 शेखर गायकवाड यांनी सांगितले की, 13 च्या मध्यरात्री लॉकडाऊन अंमलबाजावणीस सुरुवात होईल.त्याआधी नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळातील आपली जीवनावश्यक वस्तूंची तयारी करून घ्यावी..या तयारीसाठी 3 दिवसांचा अवधी दिला आहे. पहिले पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.त्यासंबंधीची नियमावली महापालिका उद्या जाहीर करेल.. 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर म्हणाले; कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी हा लॉकडाऊन कोरोना टेस्ट वाढणावण्यावर भर , सांशीयत व्यक्तींचा शोध, पहिल्या लॉकडाऊन मध्ये सवलती दिलेल्या उद्योगांसाठीच लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. 

-

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटल