शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे लसीकरणात अव्वल! पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत तब्ब्ल '६० लाखांचा' टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:38 IST

एकूण लसीकरणापैकी ४४ लाख ९५ हजार २१८ जणांनी पहिला, तर १५ लाख ९ हजार ४२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे

ठळक मुद्देपुणे शहरातील २६ लाख ७७ हजार ३४४ जणांचा समावेश

पुणे : देशात महाराष्ट्र राज्याने लसीकरणाबाबतीत कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर राज्यात पुणे जिल्हा लसीकरणात अव्व्ल स्थानावर असून पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत ६० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पुणे शहरातील २६ लाख ७७ हजार ३४४ जणांचा समावेश आहे. एकूण लसीकरणापैकी ४४ लाख ९५ हजार २१८ जणांनी पहिला, तर १५ लाख ९ हजार ४२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील सर्व व ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे, तिसऱ्या टप्प्यात सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे आणि चौथ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पिंपरी चिंचवडमधील १० लाख ७८ हजार ३२४, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२ लाख ४८ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिक आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील मिळून एकूण ८५ लाख ३९ हजार ७०६ नागरिक कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत.

काहींचे एक तर काहींचे दोन डोस पूर्ण 

आतापर्यंत १ लाख ५६ हजार ८८८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला, तर यापैकी १ लाख १३ हजार ८३४ जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. २ लाख ५५ हजार २५९ फ्रंट लाइन वर्कर्सनी पहिला, तर यापैकी १ लाख ६२ हजार १८४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यातील ९ लाख २५ हजार ९६७ ज्येष्ठ नागरिकांचा एक आणि यापैकी ५ लाख ५४ हजार २९४ ज्येष्ठ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. ४५ ते ५९ वयोगटातील ११ लाख ४४ हजार ७७३ जणांचा पहिला तर, यापैकी सहा लाख ६३८ जणांचे दोन्ही डोस झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdocterडॉक्टर