पुणे : गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई, अद्ययावत यंत्रसामुग्रीची खरेदी, रुग्णालयांचा देखभाल व दुरुस्ती खर्च आदी विविध कारणांचा विचार करून शासनाने शासकीय वैद्यकीय सेवेसाठी ३० टक्के दरवाढ केली आहे. शासनाच्या या आदेशानुसार ससून रुग्णालयात बुधवारपासून (दि.२०) नवीन दरानुसार रुग्णशुल्क घेण्यास सुरुवात करण्यात येणार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांना दर्जेदार व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अद्ययावत व किमती यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यात आली. शासकीय रुग्णालयात येणाºया गोरगरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात मिळणाºया सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांतील वाढलेली महागाई व अन्य गोष्टींचा विचार करून शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येणाºया सुविधांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथील अधिष्ठाता यांच्याकडून शिफारस मागविल्या. यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग या दोघांच्या दरामध्ये तफावत येऊ नये, म्हणून शासनाने सर्वांसाठी एकच दरवाढ लागू केली आहे. ससून रुग्णालयात गेल्या सहा वर्षांनंतर प्रथमच ही दरवाढ लगू करण्यात येत आहे.याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले, की ससून रुग्णालयामध्ये बुधवारपासून तपासणी सुविधांसाठी सुधारित शुल्काची अंमलबजावणी करण्यात येत आहे.बाह्यरुग्णालाप्रतिदिन २० रुपये फी-बाह्यरुग्ण विभागाचे शुल्क प्रतिदिन २० रुपये, आंतररुग्ण शुल्क ३० रुपये, फास्टिंग व पीपी ७५ रुपये, प्रति एक्स-रे ७० रुपये, अॅब्डॉमिन व पेल्व्हीस सोनोग्राफी १२० रुपये, कलर डॉप्लर २५० रुपये, मायनर सर्जरी ११० रुपये, मेजर सर्जरी ११०० रुपये, डॉयग्नोस्टिक अॅन्जिओग्राफी३२०० रुपये, अॅन्जिओप्लास्टी ४००० रुपये असे दरआकारण्यात येणार आहे.रुग्णालयातील प्रत्येक सुविधेसाठी सरासरी ३० टक्केदरवाढ करण्यात आली असल्याचे चंदनवाले यांनी स्पष्ट केले.ससूनमध्ये ९० टक्के रुग्णांवर मोफत उपचारससून रुग्णालयामध्ये येणाºया रुग्णांना संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी योजना, दुर्बल रुग्णांवर मोफत उपाचर योजना आदी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. तर शासनाच्या या योजनांमध्ये न बसणाºया किंवा काही कागदपत्रे अपूर्ण असणाºया रुग्णांसाठी विविध संस्थांकडून, दानशूर व्यक्तींकडून मिळणाºया देणगीतून मोफत उपचार करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असतो. यामुळे ससूनमध्ये येणाºया सरासरी ९० टक्के रुग्णांवर मोफतच उपचार केले जातात.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता ससून रुग्णालय
पुणे : शासकीय वैद्यकीय सेवा महागली, ३० टक्के दरवाढ, ससूनमध्ये आजपासून सुधारित दराची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 05:10 IST