शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे कचरा संकलन मॉडेल दक्षिणपंथी देशांसाठी मार्गदर्शक  : डॉ. नील टॅन्ग्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 17:36 IST

पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापनाचे व विकेंद्रीकरण पध्दतीचे कौतुक

ठळक मुद्देकचरा व्यवस्थापन-प्रक्रियेबाबत कार्यशाळा

पुणे : ‘‘पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापनाचे व विकेंद्रीकरण पध्दतीचे कौतुक असून  ‘स्वच्छ’ची कचरा संकलन सेवा, कचरावेचकांच्या व असंघटित क्षेत्राचा समावेश, कचऱ्याचे वर्गीकरण, रिसायकलिंग, मनपाचे ओला कचरा जिरविण्याचे विविध विकेंद्रित प्रकल्प व जिथे निर्माण होतो तिथेच कचरा जिरवा हे धोरण आदर्श असून विविध दक्षिणपंथी देश (ब्राझील, इंडोनेशिया, फिलीपिन्स, साऊथ आफ्रिका इ.) या मॉडेलकडे प्रेरणा म्हणून पाहत आहेत. तुमचे हे मॉडेल्स चालू ठेवा,’’ असे मत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि विज्ञान व धोरण संचालक डॉ. नील टॅन्ग्री यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अभियांत्रिकी व प्रशासकीय कर्मचाºयांसाठी  ‘स्टेनेबल वेस्ट प्रोसेससिंग’ विषयावर कार्यक्षमता वाढ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये समूचित एनव्हिरो टेक आणि एआरटीआयच्या डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी कर्मचाºयांसोबत कचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा केली. यावेळी स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे यांनी महापालिका-स्वच्छचे कचरा संकलन मॉडेल, असंघटित क्षेत्रामार्फत होणारे रिसायकलिंग, आटीसी  कंपनीच्या मदतीने होणारे एम.एल.पी. (मल्टीलेय प्लास्टीक) रिसायकलिंग व एचडीपीई टू थ्री डी प्रिंटर फिलामेंट या विविध यशस्वी प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. संकेत जाधव, कनिष्ठ अभियंता, यांनी महानगरपालिकेच्या ओला व सुका कचºयाच्या विविध प्रकल्पांबाबत तसेच महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनात करीत असलेल्या कामांचे सादरीकरण केले. मोळक म्हणाले, मिशन २०२० व व्हिजन शून्य ते शंभर हे पूर्ण करण्याबरोबरच पुणे शहर अनेक शहरांच्या पुढे आहे. असे असले तरी पालिका नवीन पद्धती शिकणे आणि प्रयोग करण्यास सदैव आघाडीवर राहील असे स्पष्ट केले.  यावेळी डॉ. कर्वे, यार्दीच्या सीएसआर प्रमुख भारती कोठावले, अविनाश मधाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोळक यांनी केले. तर  आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे यांनी आभर मानले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका