शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला ड्रग्जचा विळखा; आणखी सहा जणांना अटक, दोन अधिकारी आणि दोन पोलिस निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 07:46 IST

१३ जणांना पोलिस कोठडी; दोन अधिकारी आणि दोन पोलिस निलंबित 

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लेझर लाउंज (एल ३) मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणात अटकेतील सात जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान,  पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन वरिष्ठ अधिकारी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तर उत्पादन शुल्क विभागाने आणखी सहाजणांना अटक केली आहे.

बारच्या जागेचे मालक संतोष कामठे (शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (धानोरी), योगेंद्र गिरासे (भूगाव), रवी माहेश्वरी (उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डीजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तर आयोजनात सहभागी झालेले रोहन गायकवाड (हडपसर) आणि मानस मल्लिक (येरवडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

एफसी रोड ड्रग्ज प्रकरण : दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई- फर्ग्युसन रोडवरील एल ३ नामक पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. - पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, रात्रपाळीदरम्यान शनिवारी गस्तीवर असणारे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.

अटक केलेले सर्व परप्रांतीय- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल-३’वर छापा टाकला. यात सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला; तसेच सहा वेटरना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. - या सहा आरोपींनाही न्यायालयाने २९ जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हे सर्व परप्रांतीय आहेत. 

संबंधित बांधकामांवर बुलडोझर फिरवापुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पुण्याची ओळख होतय ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’‘विद्येचे माहेरघर’ असलेल्या पुण्याची ओळख आता ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत आहे. सरकारमुळे  पुण्याची बदनामी होत आहे, टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थ