शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर संकलनात पुणे विभाग देशात अव्वल; मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 12:23 IST

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल ७५ टक्के करसंकलन करून, पुणे विभागाने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. चालू आर्थिक वर्षांत बुधवार (दि.१७) अखेरीस ३७ हजार ३५६ कोटी रुपयांची नक्त वसुली झाली आहे.

ठळक मुद्देएकूण कॉर्पोरेट करसंकलनात तब्बल २६.७० टक्क्यांच्या वृद्धीसह १९ हजार ३३२ कोटी रुपयांची वसुलीआगाऊ करसंकलनात पुणे विभागात १९.४९, तर देशात सरासरी १२.७३ टक्क्यांनी झाली वाढ

पुणे : प्राप्तिकर विभागाने दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल ७५ टक्के करसंकलन करून, पुणे विभागाने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. चालू आर्थिक वर्षांत बुधवार (दि.१७) अखेरीस ३७ हजार ३५६ कोटी रुपयांची नक्त वसुली झाली असून, एकूण कॉर्पोरेट करसंकलनात तब्बल २६.७० टक्क्यांच्या वृद्धीसह १९ हजार ३३२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. कॉर्पोरेट वृद्धीचा हा आकडा देशात अव्वल ठरला आहे. पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. इतिहासात प्रथमच पुणे विभागाने अशी कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षांत देशातील अव्वल पाच विभागांना दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ पुणे विभागाने उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. ढोबळ करसंकलनात कॉर्पोरेट १९ हजार ३३२ आणि प्राप्तिकर २२ हजार ८५८ असा ४२ हजार १९० कोटी रुपयांचा कर जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १८.७८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.  गेल्या आर्थिक वर्षांत (२०१६-१७) कॉर्पोरेट १५ हजार २५७ आणि प्राप्तिकर २० हजार २६३ कोटी रुपये झाला होता. ही रक्कम ३५ हजार ५२१ कोटी रुपये भरते. देशात ढोबळ करसंकलनात कॉर्पोरेटचा वाटा ४ लाख ७३ हजार ७३९ कोटी असून, प्राप्तिकराद्वारे ३ लाख २८ हजार ९२६ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम ८ लाख २ हजार ६६५ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १३.४४ टक्के वाढ झाली आहे. पुणे विभागात नक्त करसंकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २४.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

आगाऊ करसंकलनात वाढ आगाऊ करसंकलनात पुणे विभागात १९.४९, तर देशात सरासरी १२.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षांत कॉर्पोरेटकडून ९ हजार ८४६, तर प्राप्तिकराद्वारे ५ हजार ३१२ असा १५ हजार १५८ कोटींचा भरणा झाला आहे. मागील आर्थिक वर्षांत (२०१६-१७) कॉर्पोरेटने ८ हजार ५२, प्राप्तिकरचा ४ हजार ६३३ असा १२ हजार ६८५ कोटी रुपयांचा भरणा झाला होता. 

टॅग्स :Puneपुणे