शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरी पेशाला लांच्छन; दाभोलकर तपासावेळी प्लँचेट आता मांत्रिक... गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 16:06 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपासाच्या वेळी प्लॅंचेट करण्यात आले होते आणि आता खुद्द डॉक्टरांनी मांत्रिक आणला

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत एका 24 वर्षीय विवाहितेला प्राण गमवावे लागले आहेत.  अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेनंतर संताप व्यक्त करताना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

डॉक्टरी पेशाला अत्यंत लांच्छनास्पद असा हा प्रकार आहे. पुण्यात होणारे प्रकारे धक्कादायक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपासाच्या वेळी प्लॅंचेट करण्यात आले होते आणि आता खुद्द डॉक्टरांनी मांत्रिक आणला होता. हे गंभीर आहे. आम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणारंच आहोत. पण जादूटोणा विरोधात पोलिसही तक्रार दाखल करू शकतात, त्यामुळे त्यांनी आम्ही तक्रार दाखल करण्याची वाट बघू नये अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदीनी जाधव यांनी दिली आहे. 

दोन दिवसांपूर्वी संध्या सोनवणे (वय 24,  राहणार दत्तवाडी, पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनवणे यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी  स्वारगेट येथील डॉ सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र तेथील उपचारांना यश न आल्यामुळे त्यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर डॉ. चव्हाण दीनानाथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासायला येत असत. नंतर त्यांनी एक दिवस मांत्रिकाला बोलावलं आणि त्याच्यामार्फतही उतारा वगैरे करण्याचा प्रयत्न केला.याबाबत रुग्णाच्या भावाने माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मंत्रिकाला बोलवल्याचे सांगितले. चव्हाण यांनी  चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली असून त्यातच  जीव गमवावा लागल्याचेही नमूद केले.

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. 

  

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टर