शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
5
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
6
 सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’ 
7
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
8
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
9
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
10
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
11
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
12
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
13
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
14
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
15
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
16
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
17
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
18
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
20
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

पुणे सायकल प्लॅन : एफसी, जेएम रोड पुन्हा दुहेरी? एकेरी वाहतूक मार्ग बदलण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 3:42 AM

एकेकाळी सायकलचे शहर म्हणून नावाजलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा सायकलला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने पुणे सायकल प्लॅन तयार केला असून, त्यात सायकलस्वारांना रस्त्यावरून सुरक्षितपणे सायकल चालविता यावी, यासाठी अनेक प्रस्ताव दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एकेकाळी सायकलचे शहर म्हणून नावाजलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा सायकलला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने पुणे सायकल प्लॅन तयार केला असून, त्यात सायकलस्वारांना रस्त्यावरून सुरक्षितपणे सायकल चालविता यावी, यासाठी अनेक प्रस्ताव दिले आहेत़ त्यात दोन लेनपेक्षा अधिक मोठे रस्ते पुन्हा दुहेरी करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे़ त्यात प्रामुख्याने फर्ग्युसन रस्ता आणि जंगलीमहाराज रस्त्याचा समावेश आहे़फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्ता हे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असून, आठ वर्षांपूर्वी आॅगस्ट २००९मध्ये तेथील वाहतूक एकेरी करण्यात आली़ फर्ग्युसन रस्त्यावर एकेकाळी मोठी वडाची झाडे होती़ रस्तारुंदीकरणात ती तोडण्यात आली़ त्या वेळी त्याला खूप विरोध झाला होता़ परंतु, वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन ही झाडे काढण्यात आली़ त्यानंतर वाहनांची संख्या जशी वाढत गेली़ तशी वाहतूककोंडी होऊ लागली़ त्यावर उपाय म्हणून फर्ग्युसन व जंगली महाराज रस्ता एकेरी करण्यात आला़ या बदलाला सर्वच क्षेत्रातून विरोध झाला़ अगदी पीएमपीनेही त्याला विरोध केला़ कारण पीएमपीच्या १६०० बसगाड्यांच्या फेºया या जंगली महाराज रस्त्यावरुन फर्ग्युसन रस्त्याकडे वळवाव्या लागल्या़ त्यांच्या इंधन खर्चात वाढ झाली़ त्यांना दोन्ही मार्गावरील एका बाजूचे बसस्टॉप काढून टाकावे लागले़ दोन्ही रस्त्यावरील बस प्रवाशांना बससाठी लांबवर जावे लागू लागले़ जंगलीमहाराज रस्त्यावरील हॉटेलचालकांनीही त्याला विरोध दर्शविला होता़ पण, वाहनांचा रेटाच इतका होता, की शेवटी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हे दोन्ही रस्ते एकेरी करण्यात आले़ पण हे करताना प्लॅन तयार करण्यात आला होता़ बस, सायकलसाठी स्वतंत्र मार्गाची आखणी आजवर झाली नाही़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांचा वेग वाढला़ अपघाताचा धोका वाढला़ सायकलस्वार आणि पादचाºयांसाठी तो धोकादायक ठरू लागला आहे़ मार्ग एकेरी केल्यानंतर १५ दिवसांतच दोन्ही रस्त्यांवर झालेल्या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला होता़पुणे सायकल प्लॅनमध्ये याचा विचार करण्यात आला आहे़ एकेरी मार्गावर दुचाकी व अन्य वाहनांचा वेग वाढतो़ त्यातून सायकलस्वारांना दोन पेक्षा अधिक लेन असलेल्या रस्त्यावर उजवीकडे वळणे धोकादायक ठरत आहे़ अशा रस्त्यांवर पादचाºयांना रस्ता ओलांडणे दिव्य होऊन बसते़ त्यामुळे सायकल व पादचाºयांसाठी असे रस्ते सुरक्षित नसल्याने हे दोन्ही रस्ते दुहेरी करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे़ एकेरी रस्त्यांमुळे रोड सेफ्टीचा प्रश्न निर्माण होत असल्याने सायकलस्वार व पादचाºयांच्या दृष्टीने ते धोकादायक ठरत असल्याचे दिसल्याने नेदरलँडमध्ये १९७० मध्येच अनेक लेन असलेले एकेरी रस्ते पुन्हा दुहेरी करण्यात आल्याचे उदाहरण या प्रस्तावात देण्यात आले आहे़ या प्रस्तावावर महापालिकेने लोकांच्या सूचना मागवल्या होत्या़ त्यानुसार आता त्यावर पुढे विचार करुन अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे़फर्ग्युसन व जंगलीमहाराज रस्ता एकेरी केल्यानंतर त्यावर पादचाºयांसाठी स्वतंत्र सिग्नल व रस्ता ओलांडण्यासाठी वेगळा मार्ग करणे, बस आणि सायकलसाठी स्वतंत्र मार्ग करणे, पादचारी कोठूनही रस्ता ओलांडतात, त्यासाठी फुटपाथवर रेलिंग बसवून ते फक्त रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच खुले असतील, अशी व्यवस्था करणे असा सर्व प्लॅन महापालिकेने तयार केला होता़ त्याला वाहतूक विभागाने मान्यताही दिली होती़ पण, गेल्या सात वर्षांत त्यातील काहीही झाले नाही़एकेरी रस्ता करण्याचे फायदे खूपच तात्पुरते ठरले़ फर्ग्युसन रस्त्यावर मोटारींना पार्किंगसाठी जागा देण्यात आली़ त्यामुळे पूर्वी जेवढा रस्ता वाहनांना मिळत होता, तितकाच रस्ता आता वाहनांना उपलब्ध होत आहे़ जंगलीमहाराज रोडवर सध्या फुटपाथ मोठा करण्याचे काम सुरु आहे़ पादचारी सुरक्षा प्रकल्पांतर्गत हे काम सुरु आहे़ या रस्त्यावर आता त्याच्या पुढे वाहने पार्क केली जात असल्याने हाही रस्ता आता वाहनांसाठी कमी उपलब्ध होऊ लागला आहे़याबाबत अभ्यासक जुगल राठी यांनी सांगितले की, फर्ग्युसन रस्ता व जंगलीमहाराज रस्ता एकेरी केला जात असतानाच आम्ही त्याला विरोध केला होता़ या रस्त्यांवर एकेरी वाहतूक करताना जे ठरविण्यात आले, त्यापैकी काहीही झाले नाही़ आपल्याकडे ट्रॅफिक कल्चर नाही़ पादचाºयांसाठी असलेल्या सिग्नलकडे कोणीही गांभीर्याने घेत नाही आणि आपल्या गाड्या पुढे दामटतात़ वाहतूक नियम व सर्वांना रस्त्याचा सारखाच अधिकार आहे, याविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे़ कोणती योजना आणली तरी त्याची पारदर्शक अंमलबजावणी आपल्याकडे होत नाही़ त्यातून दुसरेच प्रश्न उद्भवतात़ या दोन्ही रस्त्यांवर सायकलस्वारांना सायकल चालविणे व उजवीकडे वळणे वेगाने जाणाºया वाहनांमुळे अशक्य होऊन बसते़शहरातील वाहतुकीचा वेग हा २० ते ३० किमीपेक्षा अधिकनसावा़ सायकलस्वारांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नाही अशा रस्त्यांवर असा वेग धोकादायक ठरतो़ त्यामुळे हे रस्ते पुन्हा दुहेरी करणे आवश्यकच आहे़फेबुवारी २०१५ मध्ये वाहतूक शाखेने जंगलीमहाराज रस्त्यावर नटराजचौक ते झाशी राणी चौकदरम्यान रविवारी दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला होता़ पण, त्यासाठी पुरेशी तयारी करण्यात आली नाही़ तसेच लोकांमध्येही जागृती न झाल्याने हा प्रयोग काही दिवसांतच थांबविण्यात आला होता़महापालिकेच्या सायकल प्लॅनमध्ये फर्ग्युसन व जंगलीमहाराज रस्ता दुहेरी करण्याचा प्रस्ताव आहे़ त्यावर त्यांनी लोकांची मते मागविली होती़ ती आम्ही दिली आहेत़ कोणत्याही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी केली तरच त्याचे फायदे सर्वांना मिळू शकतात़ पण, महापालिकेकडून त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही़ या सायकल प्लॅनची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे़ - जुगल राठी, सजग नागरिक मंच

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र