शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Pune Corona virus News: पुणे शहरात बुधवारी ५ हजार ६५१  तर पिंपरीत २,७८४ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 21:28 IST

पुणे शहरात कोरोनाबाधितांची टक्केवारी २१. ३६ टक्के 

पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा बुधवारीही साडेपाच हजाराच्या पुढे राहिला असून, आज केलेल्या २६ हजार १२० तपासणीमध्ये ५ हजार ६५१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २१़६३ टक्के इतकी आहे. 

शहरात आज दिवसभरात तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १३ जण हे शहराबाहेरील आहेत़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही १़़८२ टक्के इतकी आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ३२५ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ९५७ रूग्ण हे गंभीर आहेत. तर आज दिवसभरात ४ हजार ३६१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४६ हजार ७१ इतका झाला आहे. 

शहरात आजपर्यंत १६ लाख १९ हजार ८५६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ५ हजार ३७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ५३ हजार ७३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५६७ झाली आहे. 

..... 

चिंचवड आणि थेरगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. दिवसभरात सर्वाधिक रुग्ण एक हजार चिंचवड, रावेत, थेरगाव, काळेवाडी परिसरात आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेंनी कमी झाली आहे. २ हजार २५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २९०० आलेली रुग्णसंख्या दोनशेंनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ८ हजार ३१९ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ४ हजार ५४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ७४० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ४ हजार ११३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज आठ हजार जणांना डिस्चार्ज दिला आहे.

............................

 कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तुलनेत सहाशेंनी कोरोनामुक्त वाढले आहेत.  एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३२ हजार ३८६वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार ७६८ वर गेली आहे.शहरातील १३ जणांचा बळी

कोरोनामुळे बळी गेला आहे.

..................................

१२ हजार जणांना लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. शहरातील महापालिकेच्या ५९ आणि खासगी २१ अशा एकूण ८० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात १० हजार १४० जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह १ हजार ६०८ जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाºया ११ हजार ७६० जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या २ लाख २० हजार ८५३ वर  पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcommissionerआयुक्त