शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona News : अवघ्या दोन आठवड्यात जम्बो @५५० रुग्ण; आणखी क्षमता वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 19:46 IST

दुर्घटना घडू नये याचीही घेतली जातेय खबरदारी...

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरदान ठरलेले जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात ५५० रुग्णांवर जाऊन पोचले आहे. येत्या दोन दिवसात जम्बोमधील खाटा ६०० पर्यन्त नेण्यात येणार असून हळूहळू पूर्ण क्षमतेने उपचार सुरू केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रूग्णांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी गंभीर परिस्थती निर्माण झाली होती, तशी स्थिती पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. 

 गंभीर रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्यावर उपचारांसाठी पालिकेकडून व्यवस्था करण्यात येत आहे. जम्बो सोबतच आणखी चार कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय व्यवस्थेचे कामकाज मेडिब्रोस या एजन्सीकडून केले जात आहे. जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्चपासून रुग्णालय सुरू करण्यात आल्यानंतर दोन आठवड्यात येथील रुग्णसंख्या ५५० वर पोचली आहे. मंगळवारी आणखी ५० खाटा वाढविण्यात येणार आहेत.  जम्बोमध्ये याठिकाणी एक कार्डिअक आणि साधी अशा दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. -------जम्बो रुग्णालयासाठी अखंड एसी सुरू ठेवावा लागत आहे. यासोबतच जनरेटरही कायम सुरू असतो. उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णता वाढून ही उपकरणे बिघडू नयेत अथवा आगीच्या घटना घडू नयेत याकरिता खबरदारी घेतली जात आहे. याठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांसह एक बंब २४ तास तैनात करण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका