शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे शहरासाठी महापौर निधीतून मिळाल्या आणखी नऊ रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 23:59 IST

कोविड उपचारांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत होती. दुसऱ्या लाटेचा मुकाबला सुद्धा पालिका सक्षमपणे करीत आहे. आरोग्य तंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापौर निधीमधून देण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिका त्याचाच भाग असल्याचे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. 

महापौर निधीमधून शहरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या नऊ रुग्णवाहिकांमध्ये २ अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका, २ रुग्णवाहिका आणि ५ शववाहिकांचा समावेश आहे. या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर,  स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.महापौर म्हणाले, 'कोरोनाची साथ पुणे शहरात आल्यापासून कोरोना निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी एक निधी कमी पडू दिला नाही. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. ----शहरात गेल्या पाच दिवसांत नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या घटत चालली आहे. पुणेकरांनी ढिलाई करु नये, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या