शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यात हरवलं पुणे शहर; संपूर्ण शहरावर धुक्याची चादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 10:25 IST

गेले दोन दिवस सुरू असलेला जोरदार पाऊस , त्यात मधूनच सूर्यनारायनाच्या प्रखर किरणाने जाणवणारा उष्मा याचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना आज पहाटे संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले.

पुणे : गेले दोन दिवस सुरू असलेला जोरदार पाऊस , त्यात मधूनच सूर्यनारायनाच्या प्रखर किरणाने जाणवणारा उष्मा याचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना आज पहाटे संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. एकाच दिवसात तिन्ही ऋतूचा अनुभव पुणेकरांना मिळाला. 

पुणे शहरात गेले काही दिवस सकाळी अगदी कडक उन्हाचा चटका जाणवत होता. त्यानंतर दुपारी अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन जोरदार पाऊस होत होता. विशेषतः उपनगरात काही मिनिटात इतका जोरदार पाऊस पडत होता की, समोरचे काही दिसत नव्हते. रस्त्यांवर पाणीच पाणी होऊन वाहतूक कोंडी होताना दिसत होती. परतीचा पाऊस लांबल्याने अर्धा ऑक्टोबर महिना सरत आला तरी थंडीची चाहूलही नव्हती. असे असताना आज पहाटे फिरायला बाहेर पडलेल्याना एक वेगळेच दृश्य दिसले. संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. शहरातील विविध टेकड्यांवर पहाटे फिरायला जाणाऱ्यांची पुण्यात मोठी  संख्या आहे.

तळजाई, हनुमान टेकडी, पर्वती, वेताळ टेकडी येथे फिरायला जाणाऱ्यांना आज या हंगामातील पहिले दाट धुके पडलेले पहायला मिळाले. धुके पडायला सुरुवात झाली, याचा अर्थ पाऊस संपला असा घेतला जातो. थंडीत व्यायाम करायला टेकडीवर जाणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ होत असते. 

आज तळजाई टेकडीवर फिरायला गेलेल्याना संपूर्ण टेकडीवर धुक्याची चादर पसरल्याचे अनुभव आला. धुके इतके दाट होते की काही अंतरावरच दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांना हेड लाईट लावून गाडी चालवावी लागत होती.  धुक्याने संपूर्ण शहराला आपल्या कवेत घेतल्याचे शहरातील विविध टेकड्यांवरून दिसून येत होते. सकाळी 7 नंतर धुके विरळ होत गेले. पहाटेच घराबाहेर पडलेल्यानी या हंगामातील पहिल्या धुक्याचा मनमुराद आनंद लुटला. 

टॅग्स :Puneपुणे