शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

By राजू इनामदार | Updated: July 12, 2024 16:32 IST

शहराध्यक्ष अरविंद शिंदे संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही, माजी पदाधिकाऱ्यांचा आरोप

पुणे: काँग्रेसच्या शहर शाखेचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधातील पक्षीय असंतोष उफाळून आला आहे. काही माजी पदाधिकारी, प्रदेश शाखेचे सदस्य तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या विरोधात गुरूवारी मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आत या पदावर नवी नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.

देशात व राज्यातही काँग्रेसला चांगले वातावरण होते.  सन २०१९ च्या  निवडणुकीतील  साडेतीन  लाख  मतांनी  काँग्रेसचा पराभव झाला होता. तो लीड यावेळी सव्वा ते दीड लाखांनी कमी झाली. यावरून पुण्यातही मतदारांची मानसिकता काँग्रेसला मतदान करण्याची होती हेच दिसते. मात्र ज्या पद्धतीने शहराध्यक्षांनी यंत्रणा, संघटना राबवायला हवी होती ते त्यांनी केलेच नाही. उलट ऐन प्रचाराच्या वेळेस भर बैठकीतून उठून जाणे, पदाधिकाऱ्यांना टाकून बोलणे यासारखे प्रकार केले गेले. त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी बाजूला राहणेच पसंत केले असे तक्रारीत म्हटले आहे. पुणे शहरासारख्या हक्काच्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार पराभूत झाला, याचे कारण शहराध्यक्षांनी संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही असा आरोप करत काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. त्यांची मुदत संपली आहे, त्यांना पदमुक्त करावे व या पदावर नव्या, ताज्या दमाच्या तरूण पदाधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.

चेन्नीथला यांनी त्यांना सांगितले की पक्षशाखेकडे याची माहिती आली. मतभेद, भांडणे नसती तर ही जागा आपल्याला मिळाली असती असेच निवडणूक कालावधीत तिथे गेलेल्या पक्षाच्या राज्यस्तरीत नेत्यांचे तसेच निरिक्षक आमदारांचे म्हणणे आहे. पक्षाचे नुकसान होईल अशी कृती कोणीही करू नये. अधिक चौकशी करून लवकरच याबाबतीत आपण योग्य तो निर्णय घेऊ, तो सर्वांनी पाळायला हवा असे त्यांनी सांगितले.

दरम्यान शहराध्यक्ष शिंदे पंढरपूरच्या वारीत आहे. त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईलही डायव्हर्ट करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यावर त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ते १७ जुलैला पुण्यात येणार आहेत. त्यानंतरच ते याविषयी आपली भूमिका व्यक्त करतील असे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणPresidentराष्ट्राध्यक्ष