शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सायकलस्वारीला पुणेकर नागरिकांची पसंती!; महिनाभरात २६ हजार जणांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:14 IST

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींचा समावेश करून सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे‘झूमकार पीईडीएल’च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसादऔंध परिसरात दहाहून आधिक ठिकाणी सायकल स्टँडची करण्यात आली व्यवस्था

औंध : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींचा समावेश करून सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या महिन्यात या सार्वजनिक सेवेतील सायकलींची २५ हजार ७३८ एवढी बुकिंग झाली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व औंधमध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते. ‘झूमकार पीईडीएल’च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला दोन्ही ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या सेवेस प्रारंभ झाल्यानंतर  पहिल्याच आठवड्यात साडेपाच हजारांहून अधिक नागरिकांनी सायकलस्वारीचा आनंद घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण १४ हजार ३२१ इतक्या सायकल फेऱ्या झाल्या, तर औंध परिसरात सायकल फेºयांची संख्या ११ हजार ४१७ इतकी आहे.औंध परिसरात दहाहून आधिक ठिकाणी सायकल स्टँडची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यापासून ज्येष्ठ नागरिक, असे सर्वच जण सायकलस्वारीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. संपूर्ण पुणे शहरात सर्वच ठिकाणी अशी व्यवस्था असावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

स्मार्ट सिटीअंतर्गत औंधमध्ये होत असलेली विकासकामे तसेच उपलब्ध झालेल्या विविध सुविधांमुळे परिसराचा झपाट्याने कायापालट झाला आहे. पब्लिक बायसिकल शेअरिंग हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आरोग्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने असे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. अत्यल्प भाडे आणि त्वरित उपलब्ध होत असल्याने या सायकलीचा वापर सोयीचा ठरला आहे.- अनिल चैतन्य, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :AundhऔंधPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे