शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नागरिक मागतात 'भारतीय' अन् घरी घेऊन जातात 'चायनीज'; पुणेकरांची 'आत्मनिर्भरते'कडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 13:22 IST

भारतीय सामान वापरावे असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही. अशी भारतीय मालाची अवस्था आहे...

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडे दोन्ही माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

अतुल चिंचली -पुणे: नागरिक आता कमी किंमतीच्या वस्तू घेण्याकडे लक्षकेंद्रित करत आहेत. चायनाच्या वस्तू गॅरंटी नसली तरी स्वस्त असतात. यंदाची बाजारपेठ थंड आहे. तरीही आमच्याकडे भारतीय आणि चिनी दोन्ही वस्तूंचा साठा आहे. सद्यस्थितीत नागरिक भारतीय वस्तूंच्या किंमती विचारतात. पण चायनाच्या कमी किंमतीच्या वस्तूच घेऊन जात आहेत. असे व्यापाऱ्यांनी लोकमतला सांगितले. शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये नागरिकांकडून चिनी वस्तुंना प्राधान्य दिले जात होते. परंतु मध्यंतरी चिनी वस्तूंची आयात बंद झाली. पंतप्रधान मोदींनी देशाला स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लाईट माळा, झुंबर, सजावटीच्या वस्तू, मोबाईल, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळत होत्या. त्या वस्तूंची गॅरंटी नसली तरी स्वस्तात मिळत असल्याने नागरिक चिनी वस्तू घेण्यास प्राधान्य देत होते. या पार्श्वभूमीवर लोकमत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्या व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकांशी संवाद साधला.  

दुकानदार आणि नागरिक यांच्यामधील संवाद नागरिक :- ती पन्नास रुपयांची चायना माळ आहे का? दुकानदार :- पन्नासची संपली आहे, या गजरा प्रकारच्या माळा सत्तरला आहेत. नागरिक :- पण चायना आहेत का? दुकानदार :- मागच्या वर्षीच्या स्टॉकमधली चायनाचीच माळ आहे. दुकानदार :- इंडियन नवीन आल्या आहेत, त्या देऊ का? नागरिक :- नको नको, हीच चायनाची माळ द्या. कमी किंमतीची आहे, पण दोन वर्षे तरी जाते. 

...........................................................आमच्या दुकानात बल्ब, माळा, दिवाळीच्या इलेक्ट्रॉनिक पणत्या, समई, अशा अनेक वस्तू आहेत. यापैकी बऱ्याच वस्तू चायनाच्या आहेत. आता दुकानात इंडियन आणि चायना दोन्हीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिक स्वस्त वस्तुंना प्राधान्य देतात. त्या चायनाच असतात. इंडियन वस्तूंमध्ये व्हरायटी आल्या तर नागरिक इंडियन माळ, दिवे घेतील.                                            भावेश देवासी ,मॅक्स इलेक्ट्रिकल .................................................................चायनीज इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे डिझाईन, फिनिशिंग उत्तम असते. त्यातून त्यांची किंमतही कमी असते. इंडियन वस्तूंमध्ये हे दिसून येत नाही. पण किंमतीचा फरक मात्र जाणवतो. फॅन्सी आणि डेकोरेशनच्या लाईट, झुंबर यामध्ये चायना वस्तू लोकांना आवडतात. सध्यातरी अजून गर्दी वाढली नाहीये. लोक खरदेसाठी आले की कळेल. भारत सरकारने चायना वस्तूंप्रमाणे डिझाइन आणि फिनिशिंग केले. किंमतही कमी ठेवली तर लोक इंडियन वस्तूला प्राधान्य देतील.                                       दिनेश पटेल , लाईट वर्ल्ड ...................................................................रेड मी, विवो, ओप्पो,  वन प्लस अशा मोबाईल कंपनीचे उत्पादन भारतात होते. त्यावर मेड इन इंडियाच लिहितात. त्यांचे स्पेअर पार्ट चीनमधून आणले जातात.  त्यामुळे ते चायना म्हणता येणार नाही. अजूनही काही बटणचे मोबाईल मिळत आहेत. त्यांची किंमत ५०० रुपयांपासूनपुढे आहे. ते चायना पीस आहेत. ग्रामीण भागातील नागरिक असे मोबाईल घेऊन जातात. आता चायनाचे स्क्रीनटच मोबाईल आम्ही ठेवत नाही. हळूहळू नागरिक भारतीय वस्तूला प्राधान्य देतील. अशी आशा आहे.                                     राज पुरोहित , गीता मोबाईल एजन्सी ...................................................................सध्याच्या घडीला सर्व कंपनीचे टीव्ही भारतातच तयार होतात. लोक सोनी, सॅमसंग, व्हिडिओकॉन अशा कंपन्यांचे टीव्ही घेतात. साध्या कंपन्यांचे टीव्ही आणि ब्रँडेड टीव्ही यामध्ये ५,६ हजाराचा फरक असतो. साध्या कंपन्यांपैकी काही निवडक चायना कंपनी असतात. त्यांना १ वर्षाची गॅरंटी असते. ज्या लोकांचे कमी बजेट असते. ते साध्या कंपन्यांचे टीव्ही घेतात.                                        नितीन खेडेकर , ए टू झेड इलेक्ट्रॉनिक ................................................................... आम्ही जास्तीत जास्त भारतीय सामान वापरण्याचा प्रयत्न करतो. फक्त चीन नाही तर इतर कोणत्याही देशाच्या मालापेक्षा आम्ही भारतीय माल विकत घेऊ आणि इतरांनाही हेच करायला सांगू. ह्याचा परिणाम आज दिसला नाही तरी येणाऱ्या काही वर्षात नक्की जाणवेल.                                                  रवींद्र कोडणीकर, ग्राहक .............................................…...............

  भारतीय सामान वापरावे असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही. अशी भारतीय मालाची अवस्था आहे. वस्तू विकत घेताना ग्राहक म्हणून पैशाचाही विचार करावा लागतो.  भारतीय वस्तूंचा दर्जा उत्तम होणे गरजेचे आहे. देशात असणाऱ्या मध्यमवर्गीय वर्गाचा विचार केला. तर त्यांची किंमतही कमी असावी.                                                    - गजानन पवार , ग्राहक

टॅग्स :PuneपुणेchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीMarketबाजारMobileमोबाइल