शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Guidelines Pune : अजितदादांचा पुणेकरांना दिलासा नाहीच! शहरातील कोरोना निर्बंध ठेवले कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:59 IST

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून काही दिवसांपूर्वी ४.६ असलेला रेट आता ५.३ टक्के झाला आहे.

पुणे : पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढला आहे. काही दिवसांपूर्वी जो पॉझिटिव्हिटी रेट ४.६ होता आता तो 5.3 झाला आहे. याच धर्तीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोरोना निर्बंधात सूट दिली नसून आहे ते निर्बंध कायम ठेवले आहे. त्यामुळे शहरातील दुकाने ही सकाळी ७ दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहे. तसेच मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहे. 

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवारांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ३० जूनच्या रिपोर्टनुसार पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून काही दिवसांपूर्वी ४.६ असलेला रेट ५.३ टक्के झाल्याचा सांगितले. यामुळे मागील आठवड्यात लागू केलेले कोरोना निर्बंधच कायम ठेवले आहे. तसेच त्यांनी यावेळी या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. याचवेळी पुणे शहर ५१९ रुग्णवाहिका शहर आणि जिल्ह्यासाठी घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली. 

पुण्यातील मॉल का बंद? अजित पवारांनी सांगितले हे कारण.. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बंद करण्यात आलेले मॉलकधी सुरु करणार याबाबत देखील पवारांनी आपली भमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले, पुण्यातील मॉल्स सुरू करण्याबाबत विचार केला होता. परंतु, मॉलमधील एसी आणि ग्राहक संख्या मोठी असल्याने ते बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. 

पुणे कसं सुरु राहणार ? राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी संध्याकाळी सातपर्यंत असलेली दुकानांची वेळ तीन तासांनी कमी करण्यात आली आहे. तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार यांची वेळही सहा तासांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ----सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, लग्न व मनोरंजन कार्यक्रम यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीत घेता येणार आहेत. या कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच परवानगी राहणार आहे. हे कार्यक्रम ३ तासांपेक्षा अधिक काळ असू नयेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ----सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील.  दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.-----ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. -----१.पीएमपीएमएमएल आसन क्षमतेच्या ५० टक्केक्षमतेने सुरु राहील.२. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी.३. खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी.४. ही वाहने शासनाने घोषित केलेल्या लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास बंधनकारक.५. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळीला परवानगी.------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस