शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

New Year 2022: पुणेकरांनो 'न्यू इयर' घरातच साजरा करा; महापालिकेचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:17 IST

पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे.

पुणे : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडता, घरीच राहून साध्या पध्दतीने नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे.      महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात शासनाच्या गृहविभागाच्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्याबाबत सांगितले आहे. यामध्ये रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, मास्कचा वापर अनिवार्य राहिल आदी सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या विशेषत: ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सदर नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :New Yearनववर्षPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर