शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील बिल्डरला तब्बल १५ कोटी रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:03 IST

हरित लवादाचा दणका; पर्यावरण पूर्ववत करा, मगच बांधकामास परवानगी

पुणे : उंड्री येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हाउसिंग प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने १५ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावला.  नुकसानीच्या ताळेबंद स्वरुपात मांडलेली वरील रक्कम भरपाई करून पर्यावरण पूर्ववत करेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याबरोबरच संंबंधित विभागाकडून परवानगी मिळेपर्यंत बोरिंगचे पाणी वापरण्यास आणि डीजी सेट वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेशही लवादाने दिले आहेत. 

एकता हौसिंग प्रा. लि. यांचा महापालिका हद्दीतील उंड्री गावामध्ये एकता कॅलिफोर्निया नावाचा रहिवासी प्रकल्प आहे. त्यासाठी त्यांनी २००७ मध्ये पुणे महापालिकेकडून पहिली परवानगी मिळविली. दरम्यान, कंपनीने प्रकल्प रचनेत सातवेळा बदल करत जास्तीचे बांधकाम केले. बांधकामाचे क्षेत्रफळ २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असताना पर्यावरणाची पूर्वपरवानगी  बंधनकारक असतानादेखील घेतली नाही. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बांधकामासाठी आवश्यक असलेली पूर्व संमतीदेखील घेतली नाही आणि बेकायदेशीररीत्या बांधकाम चालूच ठेवले.        पर्यावरण कार्यकर्ते तानाजी गंभिरे यांनी ॲड. नितीन लोणकर आणि ॲड. सोनाली सूर्यवंशी यांच्यामार्फत हरित लवादात धाव घेत ऑगस्ट २०१९ मध्ये प्रकरण दाखल केले. त्यावर ऑक्टोबर २०१९ मध्ये पर्यावरण आघात मूल्यांकन अधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करीत प्रकल्पाची वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल दाखल करण्याचे आदेश लवादाने दिले.    त्यानुसार समितीने जानेवारी २०२० मध्ये अहवाल सादर केला. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २८ जानेवारी २०२२ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून १५ कोटी ९९ लाख रुपयांचा पर्यावरण नुकसानीचा ताळेबंद मांडला. एकता हाैसिंगने देखील प्रतिज्ञापत्र सादर करून तक्रार अर्ज रद्द करण्याची मागणी केली. अंतिम सुनावणीदरम्यान लवादाने  विकासकाचे मुद्दे खोडत पर्यावरणाची हानी केल्याबद्दल १५ कोटी ९९ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Puneपुणे