शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

बीअारटी बसस्टाॅपचे दरवाजे उघडेच; प्रवाशांचा जीव धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:55 IST

पुणेकरांना जलद वाहतूक मिळावी यासाठी पुण्यात बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली हाेती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे ही याेजना चर्चेत राहिली अाहे. बीअारटीच्या बसथांब्यांचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याने प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला अाहे.

ठळक मुद्देबसस्टाॅपचे दार उघडे असल्याने प्रवशांच्या जीवाला धाेकाअनेक दरवाजांच्या काचांना तडा गेल्याचे चित्र

पुणे : बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे दरवाजे, बस अाल्यानंतर उघडणे अपेक्षित असताना संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीअारटी मार्गातील अनेक बसस्टाॅपचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे बस अाल्यानंतर गर्दीत एखाद्याचा धक्का लागून प्रवाशाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.     शहरात जलत वाहतूकीसाठी बस रॅपिट ट्रान्सपाेर्ट अर्थात बीअारटी मार्ग सुरु करण्यात अाले. मात्र सुरुवातपासूनच या मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्याचे वेळाेवेळी समाेर अाले अाहे. बीअारटी मार्गावरील बसस्टाॅप हे रस्त्याच्या मधाेमध तयार करण्यात अाले अाहे. या बसस्टाॅपला बसविण्यात अालेले काचेचे दार हे बस दरवाजासमाेर अाल्यानंतर अापाेअाप उघडते. यासाठी तेथे सेन्साॅर बसविण्यात अाले अाहेत. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील साठे बिस्किट, मेंटल कार्नर या बसस्टाॅपचे दरवाजे हे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र अाहे. अशीच परिस्थिती इतर मार्गावरील बसस्थांब्यांची अाहे. कुठली बस ही बसस्थानकात येत अाहे यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात अाले अाहे. तेथे बस येत असल्याचे प्रवाशांना कळते. अनेकदा हे एलईडी स्क्रीन बंद असतात. किंवा जीपीएस यंत्रणेत बिघाड असल्यास अथवा बसमधील ही यंत्रणा बंद करुन ठेवली असल्यास प्रवाशांना कुठली बस येत असल्याचे कळत नाही. अशातच अनेक प्रवासी हे या दरवाज्यांमधून वाकून बघत असल्याने अपघात घडण्याची शक्यता अाहे. तसेच सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी माेठ्याप्रमाणावर गर्दी असल्याने बस अाल्यावर बसचा धक्का लागून एखाद्याचा प्राण जावू शकताे. त्याचबराेबर अनेक बसस्टाॅपच्या दरवाज्यांना तडा गेला असल्याने ते केव्हा दुरुस्त करणार असा प्रश्न अाता प्रवासी विचारतायेत.    याबाबत बाेलताना पीएमपीचे सहव्यवस्थापक अजय चारठणकर म्हणाले, बीअारटी बसस्टाॅपच्या दरवाजांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार अाहे. काही दरवाज्यांना तडा गेला अाहे. हे काम तातडीने हाती घेण्यात येणार अाहे. काही तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीचे काम हाेऊ शकले नव्हते. अाता पिंपरी-चिंचवड बीअारटी बसस्टाॅप देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार अाहे. 

टॅग्स :Pune BRTपुणे बीआरटीVishrantwadiविश्रांतवाडीPuneपुणे