शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : फिरोदिया करंडकावर ‘बीएमसीसी’ची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 06:27 IST

नाट्य, कला, नृत्य, संगीत यांचे एकत्रिकरण असणारी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक होय. या फिरोदिया करंडक स्पर्धेत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य  महाविद्यालय एकांकिका इतिहास गवाह हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी  महाविद्यालय एकांकिका कि बो द्वितीय तर तृतीय क्रमांक सर परशुभाऊ महाविद्यालय एकांकिका सरयल यांनी मिळवला आहे.

पुणे : नाट्य, कला, नृत्य, संगीत यांचे एकत्रिकरण असणारी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक होय. या फिरोदिया करंडक स्पर्धेत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य  महाविद्यालय एकांकिका इतिहास गवाह हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी  महाविद्यालय एकांकिका कि बो द्वितीय तर तृतीय क्रमांक सर परशुभाऊ महाविद्यालय एकांकिका सरयल यांनी मिळवला आहे. फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेच्या अंतिम फेरीत नऊ महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. सर्व महाविद्यालयांनी अतिशय उत्साहात आणि जोशात या स्पर्धेत सादरीकरण केले. आणि तीन महाविद्यालयांनी बक्षीस मिळवून आपला मान मिळवला. सर्वोत्तम शिस्तप्रिय संघ म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांची आणि प्रथम फिरोदिया करंडक स्पर्धेत भाग घेतला म्हणून जवाहरलाल नेहरू अभियंत्रिकी महाविद्यालय यांची निवड करण्यात आली. या फिरोदिया करंडक स्पर्धेत ३३ महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १.सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे एकांकिका- सरयल, २.विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे एकांकिका - कि बो, ३. महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे एकांकिका - झर्मिना, ४.पी.ई. एस मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकांकिका - मूक आक्रंदन, ५.श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे एकांकिका - नॉट अगेन, ६.मॉडर्न कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय पुणे एकांकिका - आहुती, ७. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकांकिका - प्लेअर टू, ८.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद एकांकिका - कथेकरी, ९. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे एकांकिका - इतिहास गवाह हे. या ९ महाविद्यालयीन संघाची निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीचे परीक्षण विश्वजीत जोशी, अद्वैत दादरकर, राधिका इंगळे, अरुंधती पटवर्धन, आशुतोष परांडकर यांनी केले. तर अंतिम फेरीचे परीक्षण संजय जाधव, मधुरा वेलणकर, कविता लाड, सुमित राघवण यांनी केले.

टॅग्स :Puneपुणे