शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील भिडे वाड्याकरिता ‘महाधिवक्त्यां’नी बाजू मांडावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 22:00 IST

भिडे वाड्याचे स्मारक होण्यामध्ये नेमक्या काय अडचणी

ठळक मुद्देपालिका देणार पत्र : शासनाने आदेश देण्यासंदर्भात करणार विनंती

पुणे : मुलींची पहिली शाळा ज्या ठिकाणी भरली त्या ‘भिडे वाड्या’चे स्मारक होण्यासाठी पालिकेच्या आणि शासनाच्या बाजूने महाधिवक्तांनी न्यायालयात बाजू मांडावी. राज्य शासनाने त्यांना तशा सूचना द्याव्यात अशी विनंती करण्याकरिता महापालिका शासनाला आणि महाधिवक्त्यांना पत्र देणार आहे. यासोबतच पालिकेच्या पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाने समन्वयाने काम करुन धोकादायक झालेला हा वाडा रिकामा करुन घ्यावा असेही सोमवारी याविषयावर बोलाविण्यात आलेल्या बैठकीमध्ये ठरले. भिडे वाड्याचे स्मारक होण्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नगरसेवक योगेश ससाणे यांनी प्रभारी आयुक्त तथा अतिरीक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांच्या कक्षात बैठक बोलावली होती. या बैठकीला भूसंपादन, विधी, बांधकाम आणि हेरीटेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भिडे वाड्याचे दोन मालक न्यायालयामध्ये गेलेले असून सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये आहे. भिडे वाड्याची इमारत जीर्णावस्थेत असून मोडकळीस आलेली आहे. याठिकाणी राहणारे भाडेकरु, पोटभाडेकरु आणि मालकांनाही यापुर्वी पालिकेने नोटीसा बजावलेल्या आहेत. बैठकीमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया, हेरीटेज विभागाचे नियोजन आणि न्यायालयातील सद्यस्थिती याविषयी चर्चा करण्यात आली. मूळ मालकाने जागा ताब्यात देण्यासंदर्भात दावा दाखल केलेला आहे. ही जागा हेरीटेज म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये ही जागा ताब्यात घेण्याकरिता आजच्या बाजारभावाप्रमाणे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम न्यायालयात भरली तर जागेचा ताबा मिळू शकतो. आगेचे  ‘अ‍ॅवॉर्ड’ करुन घेणे अधिक सोपे होईल. पालिकेने यापुर्वी एक कोटी रुपये भरलेले असल्याचेही बैठकीमध्ये सांगण्यात आले. वाडा धोकादायक बनल्याने भाडेकरु आणि पोटभाडेकरुंना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. परंतू, तरीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न अतिरीक्त आयुक्तांनी अधिकाºयांना विचारला. इमारत धोकादायक असल्यामुळे तेथून सर्वांना बाहेर काढून वाडा उतरविणे आवश्यक असल्याचे यावेळी अधिकारी म्हणाले. या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे आणि त्यासाठी आवश्यक असलेला जागेचा ताबा मिळावा याकरिता राज्य शासनाच्यावतीने महाधिवक्यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडावी असे या बैठकीमध्ये ठरले. त्यानुसार, राज्य शासन आणि महाधिवक्त्यांना पत्र पाठविण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.====स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे. स्मारकाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्याकरिता अतिरीक्त आयुक्तांकडे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमधील चर्चेनुसार राज्याच्या महाधिवक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारे पत्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. येत्या 6 जानेवारीला यासंदर्भात न्यायालयात सुनावणी असल्याने त्यापुर्वी सरकार स्थापन झाले तर स्मारकाचा मार्ग अधिक सुकर होईल. - योगेश ससाणे, नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका