शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
5
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
6
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
7
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
8
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
9
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
10
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
11
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
12
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
13
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
14
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
15
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
16
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
17
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
18
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
19
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
20
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या

पुणे: भाऊसाहेब रंगारी मंडळाने नाकारला महापालिकेचा सन्मान, मंडळाचे कार्यकर्ते गेले निघून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 07:40 IST

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली यावरून सुरू असलेलं मान-अपमान नाट्य आज गणपती विसर्जनाच्या वेळीही पाहायला मिळालं.

ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली यावरून सुरू असलेल्या वादाची झलक आज गणपती विसर्जनाच्या वेळीही पाहायला मिळाली. भाऊसाहेब रंगारी मंडळाने आज  महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास नकार दिला.

पुणे, दि. 9 - सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली यावरून सुरू असलेलं मान-अपमान नाट्य गणपती विसर्जनाच्या वेळीही पाहायला मिळालं. कारण भाऊसाहेब रंगारी मंडळाने महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास नकार दिला. महापौरांनी भाऊ रंगारी गणपती मंडळाला आरतीचे आमंत्रण दिले मात्र, आमंत्रण न स्विकारताच मिरवणूक निघून गेली.

भाऊसाहेब रंगारी मंडळ पहाटे साडे चारच्या सुमारास टिळक चौकात आले. त्यांनी तासभर त्यांच्या पथकाने वादन केले. त्यानंतर अलका चौकात आले असताना महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास आणि आरतीसाठी बोलावले असता त्यांनी मंडळाचा गणेश रथ तसाच पुढे नेला. सन्मानासाठी महापालिकेकडून त्यांच्या नावाची घोषणा केली जात असतानाही मंडळाचे कार्यकर्ते पुढे निघून गेले.  भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशत्सवाचे जनक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून वाद सुरू आहे.  

पुण्यात शाही थाटात शतकोत्तर रौप्य महोत्सवी विसर्जन मिरवणूक संपन्न-

फुलांची उधळण, रंगोळीच्या पायघड्या, ढोलताशाचा गजर, सनई चौघडयाचे मंगलमय सुर अन बाप्पाचा जयघोष अशा भक्तिमय वातावाराणात वैभवशाली मिरवणुकीने शहरातील मानाच्या पाच गणपतीना निरोप देण्यात आला. नेहमीच्या परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक सकाळी 10.30 वाजता सुरु झाली. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ही मिरवणुक ऐतिहासिक ठरली. शहरातील महात्मा फुले मंडई समोरील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. महापौर मुक्ता टिलक, उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार नीलम गोह्रे, मेधा कुलकर्णी, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह पक्ष-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरयाचा जयघोष झाल्या नंतर ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकी समोर कला अकादमीच्या कलाकारांनी रंगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. तसेच चौका-चौकात भव्य रंगोळी साकारण्यात आली होती. लक्ष्मी रस्ता या मुख्य मिरवणुक मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. तसेच ढोल ताशा पथकानी केलेले वादन अन प्रात्यक्षिकाना उत्स्फुर्त दाद मिळत होती. कडक उन्हातही मिरवणुकीतील उत्साह उत्तरोत्तर वाढतच गेला.

फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीत सर्वात पुढे नगरावादन सुरु होते. त्यापाठोपाठ काही मराठी कलाकारांचा समावेश असलेल्या कलावंत ढोल ताशा पथकाने वादन करून बाप्पला वंदन केले. कामायनी संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पथकाने मने जिंकली. तर पारंपरिक वेशभुषेत सहभागी झालेल्या परदेशी तरुणीनी लक्ष वेधून घेतले. चार वाजण्याच्या सुमारास कसबा गणपतीचे विसर्जन झाले.

मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 5.30 वाजता झाले. फुलानी सजविलेल्या पालखीमधे बाप्पा विराजमान झाले होते. तीन ढोल ताशा पथका सह एक बैंड पथक आणि ईशान्य राज्यातील काही विद्यार्थंचे पथक मिरावणुकीत सहभागी झाले होते. अश्व पथकामधे शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला मुलगा आणि पारंपरिक वेष भुषेतील महिलानी लक्ष वेधून घेतले. मानाच्या तिसऱ्या गुरूजी तालीम गणपतीची मिरवणुक विविधरंगी फुलानी सजविलेया विविध वाद्यांच्या आकर्षक रथात काढण्यात आली. गुलालाची मुक्त उधळण आणि ढोल ताशा पथकाचें दमदार वादन हे या मिरणुकीचे वैशिष्ठ ठरले. विविध रंगी फुलानी सजविलेल्या गरुड रथात मानाच्या चौथ्या तुलशी बाग गणपतीची मिरवणूक लक्ष वेधक ठरली. स्वरुपवर्धिनी पथकातील मुलानी सादर केलेली मल्लखांबची प्रात्यक्षिक, तलवारबाजी आणि लाठी काठी ची चित्त थरारक कसरतीना गणेश भक्तांनी उत्स्फूर्त दाद दिली. सायंकाळी श्रीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. 

मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सायंकाळी करण्यात आले. फुलानी सजविलेल्या पारंपरिक पालखीमध्ये गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांची 125 वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचे स्मरण करणारा देखावा केंद्र बिंदु ठरला. तसेच ढोल ताशा पथकानी केलेले वादन ही वाह वाह मिळवून गेले.

  

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका