शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी गोऱ्या साहेबांना कर्ज देणारी पुणेकर 'आर्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:31 IST

"इंग्लंडमधील स्टार्टअप प्रक्रिया भारतापेक्षा सोपी..."

-दिपक होमकर

पुणे : 'ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशेपेक्षा अधिक वर्षे राज्य केले त्या इंग्लंडसह संपूर्ण युरोपातील एक कोटींपेक्षा अधिक लोकांना मी आत्तापर्यंत कर्ज दिले आहे. मात्र, यापुढे दहा कोटी युरोपियन व्यावसायिकांना कर्ज देण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी मी आणि माझ्या टीमचे प्रयत्न सुरू असून, तो क्षण लवकरच येईल,' हा ठाम आत्मविश्वास आहे आर्या तावरे या तिशीतल्या युवतीचा.

युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षांखालील ३० प्रभावशाली व्यक्तींची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. त्यामध्ये पुण्याच्या आर्याचा समावेश झाला होता, तिच्याशी लंडनमध्ये संपर्क केल्यावर तिने तिच्या प्रवासानिमित्त 'लोकमत'शी संवाद साधला. यावेळी ती तिचा प्रवास, तिची महत्त्वाकांक्षा आणि पुढे असलेले चॅलेंजेस याविषयी भरभरून बोलली.

आर्या म्हणाली की, बारामतीतील काटेवाडी हे माझे मूळ गाव असले तरी माझे सारे शिक्षण पुण्यात अभिनव आणि वळसे-पाटील स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसिसमध्ये झाले. महाविद्यालयात शिकत असताना माझा भाऊ लंडनमध्ये बीई सिव्हिल करत होता. त्यामुळे मला लंडनला येण्याची संधी मिळाली. लंडनचे सौंदर्य पाहून मी लंडनच्या प्रेमात पडले. आपल्याला इथेच राहायला मिळाले तर.. त्यापेक्षा इथेच आपण जॉब केला तर असे अनेक विचार डोक्यात आले.

भारतात आल्यावरही माझ्या डोक्यातून ते विचार जात नव्हते आणि मग ठरवून मी लंडनमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. वडील बांधकाम व्यावसायिक आहेत त्यामुळे छोट्या व मध्यम बांधकाम व्यावसायिकांसमोर अर्थकारणाच्या समस्या कशा असतात, हे मी पाहिले होते. वडिलांनीही त्या व्यवसायाचे बाळकडू अगदी कळत्या वयापासून दिले. लंडनला गेल्यावरही तेथील व्यावसायिकांच्या समस्या भारतातील व्यावसायिकांसारख्याच असल्याच्या मला जाणवल्या. त्या व्यावसायिकांना मदत करायची आणि त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कंपनी काढायचे ठरवले. शिकत असतानाच वयाच्या बाविसाव्या वर्षी मी लंडनमध्ये स्टार्टअप केला.

स्टार्टअप प्रक्रिया भारतापेक्षा सोपी

इंग्लंडमधील स्टार्टअप प्रक्रिया ही भारतातील प्रक्रियेपेक्षा सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे इथे स्टार्टअप करताना प्रशासकीय अडचणी आल्याच नाहीत. भारतामध्ये माझा बिझनेस मी वाढविला नसला तरी भविष्यामध्ये त्याचे प्लॅनिंग आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांत दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेहनतीच्या जोरावर आम्ही ते साध्य करू, असा विश्वास आर्या तावरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीEnglandइंग्लंड