शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वाघ्या श्वानाच्या समाधी वादावरून संभाजी ब्रिगेडला पुणे व रायगड पोलिसांची नोटीस

By नम्रता फडणीस | Updated: June 10, 2025 17:24 IST

आमच्या नावावर दुसरे कोणीतरी गैरप्रकार करणार व आम्हाला दोषी धरणार हा नोटीस मागचा व्यापक कट; संभाजी ब्रिगेडचे नोटिशीला कायदेशीर उत्तर

पुणे : संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांना नजरकैदेत ठेवणारी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा देणारी नोटीस पुणे येथील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व रायगड पोलीस अधिक्षक यांनी खेडेकरांना दिली आहे. मात्र, खेडकर यांनी वकिलांमार्फत नोटीशी ला कायदेशीर उत्तर देताना 'पोलीसांची ही कृती म्हणजे लोकशाहीतील मुस्कटदाबी असून. कारण नसताना जाणीवपूर्वक नोटीस पाठविण्यास आली असल्याचे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी शेजारी असलेल्या ‘वाघ्या’ श्वानाच्या समाधीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटत चालला आहे. या संदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे व रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांना ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये’ बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी वाघ्या श्वानाची समाधी आहे. या समाधीचा पुतळा दिनांक ३१ मे रोजी अखेरपर्यंत काढण्यात यावा, अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली होती. या भूमिकेला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला असून, ‘वाघ्या श्वानाची समाधी संभाजी ब्रिगेड काढणार’ अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये सौरभ पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या सदस्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे की किल्ले रायगडावर कोणत्याही प्रकारचे दखलपात्र स्वरूपाचे कृत्य घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर असेल. तसेच, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ही नोटीस भविष्यात न्यायालयामध्ये पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सौरभ खेडकर यांनी अँड मिलिंद पवार यांच्यामार्फत पोलिसांना कायदेशीर उत्तर पाठविले असून, ही पोलीसांची कृती म्हणजे लोकशाहीतील मुस्कटदाबी असून. कारण नसताना जाणीवपूर्वक नोटीस पाठविण्यास आली असल्याचे उत्तरात म्हटले आहे. आमच्या नावावर दुसरे कोणीतरी गैरप्रकार करणार व आम्हाला दोषी धरणार हा नोटीशी मागचा व्यापक कट असू शकतो असे ॲड. मिलिंद पवार यांनी आपल्या नोटिशीच्या उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडPoliceपोलिसRaigadरायगडdogकुत्राShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज