शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल बसखालीं आलेल्या ज्येष्ठाचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:39 IST

पीएमपीचा ब्रेक फेल झालेला... चालकाला बस कशी थांबवावी ते कळेना... डावीकडे व उजवीकडेही वाहने असल्याने बसने समोरीला दुचाकीला धडक दिली... दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक बसखाली गेला... नागरिकांनी प्रयत्न करून बसला थांबविले आणि ज्येष्ठ नागरिकाला ओढून बाहेर काढले.

वारजे - पीएमपीचा ब्रेक फेल झालेला... चालकाला बस कशी थांबवावी ते कळेना... डावीकडे व उजवीकडेही वाहने असल्याने बसने समोरीला दुचाकीला धडक दिली... दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक बसखाली गेला... नागरिकांनी प्रयत्न करून बसला थांबविले आणि ज्येष्ठ नागरिकाला ओढून बाहेर काढले. तेव्हा ते सुखरूप होते. ते पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जुना जकात नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी दुपारी ही थरारक घटना घडली.उमाजी गणपत मरळ (वय ६४, रा. शिवणे) व त्यांचा सात वर्षीय नातू अपघातात थोडक्यात बचावले. याबाबत बसचालक, वाहक घटनेचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास डेक्कनवरून सांगरूणला जाणारी पीएमपी आंबेडकर चौकात आली. चौकात येण्यापूर्वीच (टायर फुटल्यासारखा) मोठा आवाज होऊन त्याचा ब्रेक पाइप फुटला. यामुळे ब्रेक नादुरुस्त झाल्याची कल्पना चालक रवाजी बाबूराव म्हेत्रे (वय ५४ वर्षे, रा. शिवणे) यांना आली. त्यांनी गियर बदलून बसचा ब्रेक कमी करण्याचा प्रयत्न केला. पण चौकात वाहने एका जागेवर उभी होती. तसेच बसच्या डाव्या बाजूनेही अनेक वाहने जात असल्याने बस डावीकडे वळवणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे बसने पुढे दुचाकीवर जात असलेल्या मरळ यांना धडक दिली. यात सुदैवाने त्यांचा नातू हा रस्त्याच्या उजव्या बाजूकडील सर्कलच्या बाजूला फेकला गेला. त्यास खूप काही इजा झाली नाही. पण मरळ हे मात्र दुचाकीसह खाली पडले व बसच्याखाली गेले. बस तरीही पुढे पुढे जातच होती. शेजारच्या नागरिकांनी आरडाओरड करून चालकाचे लक्ष वेधण्याचा व बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ब्रेक फेल झाल्याचे नागरिकांच्याही लक्षात आले नाही. या वेळी काही फूट बसने दुचाकीसह मरळ यांना फरफटत नेले. नंतर मात्र इतर वाहनचालक व नागरिकांनी बसला समोरून अडवले. तसेच बसखाली दुचाकी असल्याने बसचा वेग कमी झाला. तेव्हा चालकही बस थांबविण्यासाठी प्रयत्न करीत होता. एकत्रित प्रयत्न झाल्याने बस थांबली. तेव्हा नागरिकांनी बसखाली गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला ओढून बाहेर काढले. त्या ज्येष्ठ नागरिकाला जास्त काही लागले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या अपघातामुळे चौकात काही काळ कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी लगेच ब्रेक फेल झालेल्या बसला बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे