शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटींची खंडणी मागणा-या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 11:59 IST

टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे.

पुणे - टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. शनिवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केटमधील एका व्यापा-याचे शनिवारी संध्याकाळी मोटारीतून अपहरण करण्यात आले. ही माहिती पोलिसांना संध्याकाळी 6.30 वाजता मिळाली व्यापा-याच्या जिवाचा प्रश्न असल्याने पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि खबरदारी घेऊन या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या या गुन्हेगारांनी त्यानंतर आपली मागणी कमी करीत 15 लाखांवर आणली. दरम्यान, गुन्हेगारांनी व्यापा-याला कोठे नेले आहे, याची माहिती घेण्याचे काम पोलीस करत होते.  

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीश सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख तसेच गुन्हे शाखेची सर्व पथके संपूर्ण पुणे शहरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान मध्यरात्रीनंतर ते कात्रज परिसरात असल्याचे समजले. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात पसरलेले गुन्हे शाखेचे युनिट कात्रज परिसरात एकवटले. 

पोलिसांनी गुन्हेगारांनी ज्या गाडीतून व्यापा-याला पळवून नेले होते. ती गाडी शोधून काढली. ते या व्यापा-याला शिवापूरकडे घेऊन जात होते. चालत्या गाडीला ओव्हरटेक करुन पोलिसांनी चारही बाजूने ती गाडी घेरुन तिला थांबायला भाग पाडले. त्यातील व्यापा-याची आधी सुटका केली. त्यानंतर गाडीतील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी कट्टे आणि कोयते आढळून आले आहेत. गुन्हे शाखेने तिघांना पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी