शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गेले ८ दिवस कुठे होता डुग्गू? अपहरणकर्त्याचा शोध सुरू असताना महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 11:09 IST

पुण्यात अपहरण झालेला चिमुकला अखेर सापडला; आठ दिवसांनी अपहरणकर्त्यांनीच सोडले

पुणे : बाणेर परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण या चिमुरड्याला बुधवारी दुपारी पुनावळे येथे सुखरूप सोडण्यात आले. अपहरण झालेल्या ठिकाणापासून हे ठिकाण अवघे १० किलोमीटर अंतरावर असून, गेले ८ दिवस स्वर्णवला याच परिसरात अपहरणकर्त्यांनी ठेवले होते.स्वर्णव ११ जानेवारी रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास डे केअरला जात असताना दुचाकीवरून आलेल्या एकाने त्याचे अपहरण केले होते. डॉ. सतीश चव्हाण यांचा हा मुलगा असून, त्याच्या अपहरणानंतर खंडणीसाठी कोणताही फोन आला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. मात्र तो सुखरुप घरी पोहोच केल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. 

असा सापडला स्वर्णव पुनावळे येथील पाण्याच्या टाकीसमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी दादा राव हे सुरक्षारक्षक आहेत. तेथे दुपारी चेहरा झाकलेला एक जण लहान मुलाला घेऊन आला. मुलाला तुमच्याजवळ ठेवा, १० मिनिटांत येतो, असे सांगून तो निघून गेला. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यावरही तो तरुण आला नाही. मुलगा रडायला लागला तेव्हा इमारतीत लिफ्टचे काम करणाऱ्या तरुणांनी मुलाकडील बॅग पाहिल्यावर त्याच्या बाजूला एक मोबाइल नंबर लिहिलेला दिसला. त्यावर त्यांनी फोन केल्यानंतर तो डॉ. चव्हाण यांचा असल्याचे लक्षात आले. त्यांनी व्हिडिओ कॉल करून मुलगा दाखविल्यावर पोलीस अधिकारी आणि डॉ. सतीश चव्हाण व काका सचिन चव्हाण हे तेथे पोहोचले व त्यांनी मुलाला ताब्यात घेतले.

अपहरणकर्त्यांचा शोध सुरूमुलाची तब्येत व्यवस्थित आहे. अपहरणकर्त्यांविषयी काही धागेदोरे मिळाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

सर्वांचे आशीर्वाद मिळाल्याने आमचे बाळ सुखरूप घरी आले आहे. मुलगा नऊ दिवस आमच्यापासून दूर होता, त्यामुळे त्याला स्थिर होण्यास थोडा वेळ जाईल. माध्यमे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो.- डॉ. सतीश चव्हाण, मुलाचे वडील