शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: ७० लाखांचा गंडा , दहा महिलांची फसवणूक; शेअरबाजारात गुंतवणुकीचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:09 IST

शेअरबाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेने १० महिलांची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

पुणे : शेअरबाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेने १० महिलांची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी अनुजा शारंग पांडे (वय ४७, रा़ एरंडवणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला़याप्रकरणी सविता पानसरे (वय ४७, रा़ कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना जानेवारी २०१६ पासून २६ फेब्रुवारी २०१८ दरम्यान घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे या समुपदेशनाचे काम करतात़ त्यांची फेसबुकच्या माध्यमातून २०१५ मध्ये ओळख झाली होती़ त्यांना भांडारकर रोडवरील एका महिलांच्या क्लबची माहिती मिळाली़ पानसरे या त्या क्लबच्या सदस्या झाल्या़ या क्लबमध्येच त्यांची पांडे यांच्याशी ओळख झाली़ त्यांनी आपण शेअर्समध्ये पैसे गुंतविते़ त्यातून मिळणा-या फायद्यातून इतरांना चांगला परतावा देत असल्याचे सांगितले़ त्यांनी त्याबाबत चौकशी केल्यावर क्लबमधील अन्य काही महिलांनीही त्यांचे पैसे गुंतविले असल्याचे त्यांना सांगितले़ त्यानुसार त्यांनी जानेवारी २०१६ मध्ये रोख व चेकद्वारे ३० लाख रुपये पांडे यांच्याकडे शेअर्समध्ये गुंतविण्यासाठी दिले़ सुरुवातीला त्यांनी ठरल्याप्रमाणे काही वेळा गुंतविलेल्या पैशाच्या नफ्यातील रक्कम त्यांना दिली़ त्यानंतर पांडे हिने पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली़ त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना शेअर मार्केटमध्ये मंदी आहे़ त्यामुळे सध्या पैसे नाहीत, नंतर देते, असे सांगितले़पानसरे यांनी काही दिवस वाट पाहिल्यानंतरही त्यांनी पैसे न दिल्याने त्यांनी त्यांच्याकडे आपले गुंतविलेले पैसे परत मागितले़ तेव्हा पांडे हिने त्यांना पुढील तारखेचे चेक दिले़ त्यांनी त्या तारखेला बँकेत चेक भरल्यावर पांडे हिने स्टॉप पेमेंट करण्यास बँकेला सांगितल्याची माहिती मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ पानसरे यांच्याप्रमाणेच अनेक महिलांना हाच अनुभव आल्याने त्यांनी बुधवारी पोलिसांकडे धाव घेतली़ आतापर्यंत १० महिलांनी आपली फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी दिल्या असून त्यानुसार किमान ७० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे़ पांडे यांच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेल्या अनेक महिलांना त्याची अद्याप माहिती झाली नसून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ डी़ जाधव अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :Puneपुणेcrimeगुन्हे