शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुनावळे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! पुनावळे कचरा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन

By विश्वास मोरे | Updated: November 6, 2023 07:34 IST

पिंपरी - चिंचवड महापालिकेने पुनावळे मधील काटेवस्ती येथे असलेल्या जंगल परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत...

पिंपरी :  पुनावळे येथे प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विरोधात रविवारी सकाळी बाईक रॅली काढली. पुनावळे, मारुंजी, ताथवडे, जांबे, हिंजवडी, वाकड आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी चिपको आंदोलन केले. पुनावळे आमच्या हक्काचे...नाही कुणाच्या बापाचे... कचरा डेपो  हटाव...पुनावळे बचाव... अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी या रॅलीमध्येसहभाग घेतला.

पिंपरी - चिंचवड महापालिकेने पुनावळे मधील काटेवस्ती येथे असलेल्या जंगल परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. वनविभागाची २६ हेक्टर जागा महापालिकेला मिळाली असून सन २००८ मध्ये या जागेवर कचरा डेपोसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. मोशी येथील कचरा डेपो भरल्याने महापालिकेने कचरा डेपोसाठी ही पर्यायी सोय केली आहे. मात्र, या प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूला पूर्णपणे नागरी वस्ती झाली आहे. दाट लोकवस्ती असल्याने इथे कचरा डेपो करू नये, अशी पुनावळे, ताथवडे, मारुंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे.बाईक रॅली चिपको आंदोलन पुनावळे येथे हा प्रकल्प जंगल तोडून उभारण्यात येणार असल्याने इथली नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होईल, तसेच, नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, यासाठी हे आंदोलन केले. याच मागणीसाठी पिंपरी - चिंचवड को-ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स असोसिएशन यांच्यावतीने रविवारी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. पुनावळे आमच्या हक्काचे...नाही कुणाच्या बापाचे... कचरा डेपो  हटाव...पुनावळे बचाव... अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. १८ लॅटीट्यूड मॉल पुनावळे येथून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पुढे कोयते वस्ती, शिंदे वस्ती, लाईफ रिपब्लिक सोसायटी मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, ताथवडे सर्व्हिस रोड, पुनावळे, कोयते वस्ती मार्गे काटे वस्ती येथील जंगल परीसरात आली.जंगलातील प्रत्येक झाडालाआलिंगन देत नागरिकांनी चिपको आंदोलन केले. कचरा डेपो करण्यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे इथल्या निसर्गाचा र्‍हास होणार असल्याने हा विरोध करण्यात आला. महापालिकेने सन २००८ साली या जागेवर कचरा डेपोसाठी आरक्षण टाकले. मात्र, त्यावेळी या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. आता प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात लाखो नागरिक वास्तव्यास आले आहेत. प्रस्तावित कचरा डेपोपासून काही मीटर अंतरापर्यंत सोसायट्या झाल्या आहेत. त्यामुळे इथे कचरा डेपो सुरु झाल्यास इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड