शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 06:31 IST

‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी अटक करण्यात आलेले ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. हत्येत वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास पुनाळेकरने मदत केली, तर भावे याने दाभोलकरांच्या घराची रेकी केली, असा सीबीआयचा आरोप आहे.डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यातूनच या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यानंतर या दोघांना सीबीआयच्या पथकाने रविवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितले की, कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. तत्पूर्वी दाभोळकर यांच्याबाबत सर्व माहिती भावे याने रेकी करून त्यांना दिली. कळसकर आणि अंदुुरे यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी भावे याच्याकडे असून ती जप्त करायची आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तुलासह इतर चार पिस्तुले पुनाळेकरच्या सल्ल्याने ठाण्याच्या खाडीत फेकून देण्यात आली. याचा पूर्ण तपास करायचा असल्याने पोलीसकोठडी मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केली. ती मान्य करत पुनाळेकर आणि भावे यादोघांना १ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान, अ‍ॅड. पुनाळेकर याने नवी मुंबईतील सीबीआय कार्यालयात वकिलांची भेट घेण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. तो मंजूर करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संवेदनशील माहिती एका इंग्रजी नियतकालिकाला पैसे घेऊन विकली, असा आरोप अ‍ॅड. पुनाळेकरने केला. मात्र न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर