शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 1:33 PM

गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे....

ठळक मुद्देपुस्तकांचे गाव साकारणार : सरहद संस्थेतर्फे राज्यपालांना प्रस्तावसरकार संरक्षणावर खर्च करते, त्याप्रमाणे सामान्य नागरिकांची सांस्कृतिक भूकही जाणून घेण्याची गरज

- प्रज्ञा केळकर-सिंग- पुणे : प्रसिध्द काश्मीरी कवी गुलाम अहमद मेहजूर यांचा जन्म पुलवामा जिल्ह्यातील मिट्टीग्राम या गावातला. या जिल्ह्याला पुलवामा साहित्य, संस्कृती आणि कलेची परंपरा आहे. मात्र, गेल्या दोन-अडीच वषार्तील घटना पाहता पुलवामा हे दहशतवादाचे केंद्र होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर पुलवामामध्ये पुस्तकांचे गाव साकारण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेतर्फे जम्मू काश्मीरच्या राज्यपालांना देण्यात आला आहे. निवडणुकांचा काळ असल्याने जून महिन्यापासून हा प्रकल्प कार्यान्वित करता येईल, असे आश्वासन राज्यपालांकडून देण्यात आले आहे. मेहजूर यांच्या कविता सामाजिक ऐक्य, एकात्मता, प्रेमाचे नाते सांगणा-या होत्या. त्यांनी कष्टकरी, शेतकरी यांच्या वेदनाही कवितेत शब्दबध्द केल्या. त्यांना जम्मू काश्मीरचे वर्ड स्मिथ म्हणून संबोधले जाते. त्यांचे जन्मगाव कला, साहित्य, संस्कृतीचे केंद्र म्हणून उदयाला यावे, यादृष्टीने सरहद संस्थेने पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव आणि नियोजन अहवाल तयार केला. त्यावेळी मुफ्ती अहमद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यासह बैैठकही होऊन सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, काही कारणाने हा प्रकल्प त्यावेळी रखडला होता. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे. या पार्श्वभूमीवर दहशतावादाचा बीमोड होऊन सांस्कृतिक चळवळ उभी रहावी, यासाठी पुस्तकांच्या गावांचा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासंदर्भात जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.नहार म्हणाले, सरकार संरक्षणावर खर्च करते, त्याप्रमाणे सामान्य नागरिकांची सांस्कृतिक भूकही जाणून घेण्याची गरज आहे. पुलवामा पैैलग्रामच्या रस्त्यावर असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ शकते. नियोजन अहवालानुसार, महजूर यांचे स्मारक उभारावे, उद्यानांमधील झाडांना साहित्यिक, शास्त्रज्ञांची नावे द्यावीत, तेथे कवितांचे, कथावाचनाचे कार्यक्रम व्हावेत, शाळांच्या सहली याव्यात, भारतीय भाषांमधील साहित्याचे आदानप्रदान व्हावे, असे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला महजूर यांचे स्मारक उभारावे अशी कल्पना तयार करण्यात आली होती. कालांतराने महाराष्ट्रामध्ये भिलारला पुस्तकांचे गाव साकारले, त्याप्रमाणे पुलवामा येथे पुस्तकांचे गाव साकारले जाईल, अशी संकल्पना पुढे आली. त्यानुसार, शासनाशी बोलणे झाल्यानंतर शासनातर्फे निधी उभा केला जाईल आणि सरहदतर्फे या संकल्पनेला मूर्त रुप दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. सध्या लोकनियुक्त सरकार नसल्याने या प्रकल्पाना आडकाठी येऊ शकते. त्यामुळे निवडणुकांनंतर जून महिन्यापासून प्रकल्पाला सुरुवात करता येईल, असे राज्यपालांकडून सांगण्यात आले आहे.......पुस्तकांच्या गावाच्या माध्यमातून कट्टरवाद कमी होऊन पुलवामा जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ उभी राहू शकते. तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. यातून विकासाला चालना मिळेल. केंद्र शासनानेही या प्रकल्पामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. - संजय नहार, संस्थापक, सरहद

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला