शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचोरीमुळे पुलाला धोका; कारवाई होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:56 IST

राजकीय वरदहस्त असल्याने अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा

रांजणगाव सांडस : नागरगाव (ता. शिरूर) येथील भीमा नदीच्या तीरावर असणारा शिरूर-सातारा रस्त्यावरील पारगाव येथील मुख्य पुलाच्या खाली वाळूचोरांनी उत्खनन चालू केल्याने पूल पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.पारगाव येथील बंधाºयाला पाणी अडविण्यासाठी प्लेट टाकण्याचे काम सुरू असल्याने बंधाºयाच्या विरुद्ध बाजूला पाण्याचा प्रवाह कमी पडलेला आहे. त्यामुळे या भागात कधी नव्हे एवढी वाळू उघडी पडली आहे. या वाळूवर वाळूचोरांची नजर पडलेली असल्याने वाळूचोर हे दिवसा या मुख्य पुलाखाली वाळूउपसा करीत आहेत. बंधारा यापूर्वी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. आता या पुलाखाली वाळूउपसा सुरू झाल्याने पूल पडतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. प्लेट टाकल्यामुळे या भागात पाणीसाठा हा पात्रात असल्याने वाळूचोरांनी तराफ्याच्या साह्याने वाळूउपसा सुरू केला आहे. महसूल विभागाच्या अधिकाºयांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. वाळूचोरांना राजकीय अभय असल्याने त्यांना कोणत्याही अधिकाºयाच्या कारवाईची भीती वाटत नाही.वन विभागाकडूनही कारवाई होत नाहीवाळूचोर हे याच भागातील आहेत. या भागात त्यांची दहशत असल्याने महसूल विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. वाळूचोर हे वन विभागाच्या हद्दीतून दिवसाढवळ्या वाळू काढत असून वन विभाग त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? अशी विचारणा होत आहे.वाळूचोरांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच, त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाईल.-रणजित भोसले, तहसीलदार, शिरूर

टॅग्स :sandवाळूPuneपुणे