शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सकट आत्महत्या; नऊ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:53 IST

दोघांना अटक : अंत्यसंस्काराप्रसंगी मोठा पोलीस फौजफाटा; पुनर्वसनासंदर्भात सोमवारी बैठक

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वाडा पुनर्वसन येथे राहणारी पुजा सकट ही युवती बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु २२ एप्रिल रोजी पुजाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तीच्या आत्महत्येप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सोमवारी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे, तर सकट कुटुंबीयांच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे राहणारी पूजा सुरेश सकट (वय १९ वर्षे) ही युवती २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना होती. त्यांनतर रात्री उशिरा पूजा बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. त्यांनतर काही तणाव निर्माण झाला होता. पूजाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर सकट कुटुंबीयांनी पूजाच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींना अटक व सकट कुटुंबीयांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पार्थिव स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, पोलीस अधीक्षक सुएझ हक यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला असता एक महिन्यात पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन देत फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीतील इसमांवर गुन्हे दाखल करण्याचीही कार्यवाही सुरू केल्याने सोमवारी सकाळी कोरेगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.पूजा हिचे पार्थिव रोहिदास उंद्रे यांच्या विहिरीत सापडले. यावरून तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अ‍ॅड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळुराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात शिक्रापूर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३०६, ३४, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे २०१५ चे सुधारित कलम ३ (२) (५) नुसार गुन्हे दाखल केला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाकरे हे करीत आहे, तर विलास वेदपाठक, गणेश वेदपाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे.जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्यादिलीप नानासाहेब सकट (रा. केडगाव, जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश सकट कुटुंबीयांना घर सोडून जाण्याची व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, २ जानेवारी रोजी संचारबंदी लागू असतानाही त्यांचे घर, कार्यालय जाळून टाकले होते. यावेळी जयदीप सकट व पूजा सकट यांच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडला असल्याने त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतरही ११ फेबु्रवारीसही सकट यांना धमकी देण्यात आली होती. दरम्यान, २० एप्रिल रोजी रातंजन, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील यात्रा असल्याने सुरेश सकट व जयदीप सकट हे यात्रेसाठी गावी गेले असताना, दि.२१ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूजा घरातून गायब झाली. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव