शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

प्रकाशनाचा अनोखा ‘बुक टे्रलर...’

By admin | Updated: February 17, 2017 05:11 IST

रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, तीन अतिथिगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन आणि बरेच काही..!

पुणे : रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, तीन अतिथिगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन आणि बरेच काही..! हे वर्णन एखाद्या नाट्याविष्कार किंवा अभिवाचनाचे आहे, असे वाटू शकते! मात्र, साचेबद्ध चौकटीतील प्रकाशन सोहळ्यांना बगल देत लेखक वसंत लिमये यांनी ‘बुक टे्रलर’ ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे. एका संचिताच्या शोधप्रयत्नातून अस्मिता, सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या ‘विश्वस्त’ या कादंबरीचा चित्तथरारक प्रवास ‘बुक ट्रेलर’ या अभिनव प्रयोगातून रविवारी (दि. १९) उलगडणार आहे.कोणत्याही प्रकाशन सोहळ्याचा केंद्रबिंदू असायला हवी, ती ‘कादंबरी’. मात्र, या कार्यक्रमांमध्ये त्या पुस्तकाबद्दल फारसे बोलले न जाता उगाचच मान्यवरांकडून काही वेळा पाल्हाळ लावला जातो किंवा टीका तरी केली जाते व तो कार्यक्रम कंटाळवाणा ठरतो. ‘कादंबरी’ ही पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची ‘हिरॉईन’ आहे. तिचे रंगरूप, तिची जडणघडण या गोष्टी समोर यायला हव्यात. यासाठी लिमये यांनी ही अभिनव संकल्पना आणली आहे. ‘विश्वस्त’ कादंबरीच्या सूत्राबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘‘संस्कृतीचा विश्वस्त आणि वारसदार अशा दोन ध्रुवांची ताणलेली ही शोधयात्रा आहे. ‘जस्ट फॉर किक्स’ अशा गमतीशीर नावाचा पुण्यातील कॉफी हाऊसमध्ये जमणारा पाच जणांचा ग्रुप. ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणे, हा त्यांचा ध्यास आहे. कादंबरीत स्थळकाळाचा संदर्भ तोडलेले प्रसंग येतात. मग त्यामध्ये महाभारत, श्रीकृष्णाचा अंत:समय, चाणक्य, विष्णुगुप्त, चंद्रगुप्त यांच्याशी आपली भेट, सोमनाथाची लूट, गझनी महंमद, वजीर कासिम यांच्यासह गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट होते आणि कादंबरी रंगत जाते.’’