शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाह बिघडल्यास दिशाहीनता : राम प्रधान; ‘माझी वाटचाल’ आत्मचरित्राचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:57 IST

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुण्यातील विभागीय केंद्रातर्फे राम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बुधवारी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडले.

ठळक मुद्देराम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशनया पुस्तकात माझ्या सेवाकाळातील घडामोडींचा समावेश : राम प्रधान

पुणे : मनुष्य जीवनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, तरुणांनी हे वळण बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे. प्रवाह पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास आपण कोणत्या दिशेला जाऊ हे सांगता येत नाही, असे मत माजी सनदी अधिकारी राम प्रधान यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुण्यातील विभागीय केंद्रातर्फे राम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बुधवारी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडले. या वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवृत्त सचिव सुधीर देवरे, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, अजित निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रधान म्हणाले, ‘या पुस्तकात माझ्या सेवाकाळातील घडामोडींचा समावेश आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. ‘माझी वाटचाल’ हे एका परीने माझ्या आणि बऱ्याच व्यक्तींच्या कारकिर्दीचा इतिहास आहे. राजीव गांधी यांच्यासह गृहसचिव म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. मात्र, राजभवनात जाण्याचा प्रवास अनपेक्षित होता.’सुधीर देवरे म्हणाले, ‘लवकरच १० आशियन देशांचे पंतप्रधान भारतात येणार आहेत. ‘लूक ईस्ट’ धोरणावर या वेळी चर्चा होईल. मात्र, ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थैर्य, शांतता, सुबत्ता नसेल तर या धोरणाला काहीच अर्थ उरणार नाही. व्यापार, संलग्नता आणि संस्कृती हा या धोरणाचा गाभा असून, यासाठी राम प्रधान यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे,’ असेही देवरे यांनी नमूद केले.अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

निर्भीड नोंदी हव्यात ‘देशाचा इतिहास लिहिताना भारत मागे पडला. चीन, युरोपमधील लोकांनी भारतीय इतिहासाचे बारकाईने लेखन केले आहे. काय झाले, काय घडले हे लिहून ठेवताना आपण संकोच करतो. सर्व नोंदी निर्भीडपणे लिहून ठेवल्यास पुढील पिढ्यांना इतिहास मार्गदर्शक ठरू शकेल’, असे सांगतानाच ‘यशवंतराव चव्हाण यांच्या महनीय कार्याचे योग्य मूल्यमापन करण्याची गरज आहे’, असेही प्रधान यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे